आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The Story Of A Village On The Last Stretch Of The Country On The Chinese Border In Uttarakhand Amid Tensions In Ladakh

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्राउंड रिपोर्ट:सीमेवरील माणा गावात लढाऊ विमानांद्वारे निगराणी, सैन्याची मोठी जमवाजमव; हा भाग सहा महिने बर्फाच्छादित असतो, पण लोक कधीही घर सोडून जात नाहीत

माणा गावातून मनमीत8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लडाखमधील तणावात उत्तराखंडमध्ये चीन सीमेवरील देशाच्या अखेरच्या टाेकावरील गावाची कहाणी
  • उत्तराखंडमध्ये भारताची स्थिती चीनपेक्षा खूप भक्कम लष्करी

आता आम्ही चीन सीमेवरील माणा गावात आहोत. रात्रीचे दोन वाजले आहेत. सैन्याचे हेलिकॉप्टर आणि लढाऊ विमाने निगराणी करत आहेत. भारतीय चौक्यांत सैन्याच्या ट्रकच्या हालचाली सुरू आहेत. १९६२ च्या युद्धात या सीमेवर चिनी सैनिकांच्या हालचाली नव्हत्या तरीही आपले सैन्य पूर्णपणे सज्ज आहे. ही सीमा सुरक्षित ठेवण्यात येथील लोकांचेही महत्त्वाचे योगदान राहिले आहे. आधी बद्रीनाथ धामपासून ५८ किमी अंतरावरील माणापर्यंत रस्ता नव्हता तेव्हा ग्रामस्थांवरच सैन्य अवलंबून होते. माणाचे सरपंच पीतांबरसिंह मोलपा यांनी सांगितले की, “२००३ पर्यंत ग्रामस्थच लष्करी साहित्य अनेक दुर्गम पहाड ओलांडून चौक्यांपर्यंत पोहोचवत असत. माझे वडीलही १९६२ ते २००३ पर्यंत सैन्याचे साहित्य पोहोचवण्याचे काम करत होते. सध्या सैन्याच्या हालचाली खूप वाढल्या आहेत. १९६२ च्या युद्धाच्या वेळीही एवढी जमवाजमव दिसली नव्हती. लढाऊ विमानांची उड्डाणे रात्रंदिवस सुरू आहेत. आधी गावातील लोक लष्करासोबत गस्त घालायलाही जात असत. एवढेच नव्हे तर शत्रूच्या कारवायांवर नजर ठेवण्याची जबाबदारीही ग्रामस्थांचीच असायची.’

गावातीलच मन्नूसिंह रावत यांनी सांगितले, “आम्ही सीमेवरील गावात राहतो. आम्हाला आमच्या जबाबदारीची जाणीव आहे. आजही विविध प्रकारे सैन्याला मदत करतो. १९६२ मध्ये भारत-चीन युद्धानंतर सरकारने नेलांग आणि जाढूंग गाव रिकामे करून सैन्याच्या ताब्यात दिले होते. पण तेव्हा आम्ही गाव सोडण्यास नकार दिला होता. आजही ती परंपरा कायम आहे. हिवाळ्यात सहा महिने हे संपूर्ण गाव बर्फाच्छादित असते तेव्हाही आम्ही गाव सोडत नाही. माणा खिंडीपर्यंत रस्ता तयार झाल्याने भारताची स्थिती चीनच्या तुलनेत मजबूत झाली आहे. येथे तैनात सैनिकांना टेवोर-२१ या इस्रायली नाइट व्हिजन रायफली दिल्या आहेत. त्या युद्धात उपयुक्त आहेत. त्या ब्रस्ट आणि सिंगल राउंड फायर करू शकतात.

उत्तराखंडमध्ये भारताची स्थिती चीनपेक्षा खूप भक्कम लष्करी

तज्ञांनुसार, लेह, लडाख आणि ईशान्य सीमेच्या तुलनेत भारतीची स्थिती उत्तराखंडमध्ये खूप मजबूत आहे. लेह-लडाख आणि अरुणाचलमध्ये अनेक ठिकाणी चिनी चौक्या उंचावर आहेत, तर उत्तराखंडमध्ये भारतीय चौक्या चिनी चौक्यांपेक्षा उंचावर आहेत. त्यामुळे भारत चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवू शकतो. सीमेवरील जिल्ह्यांत वायुदलाच्या लढाऊ विमानांचे इमर्जन्सी टेकऑफ आणि लँडिंग करण्यासाठी पुरेशा धावपट्ट्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...