आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Story Of Bhajji's Entry Into 'Aap': A Safe Start To His Political Career; Seeing Opposition In Punjab, He Distanced Himself From BJP; The Advantage Of 'aap' With Harbhajan | Marathi News

भज्जीने 'आप'मध्ये प्रवेश केल्याची कहाणी:राजकीय कारकिर्दीला सुरक्षित सुरुवात; पंजाबमधील विरोध पाहून भाजपपासून दुरावले; हरभजनसह 'आप'चाही फायदा

मनीष शर्मा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने आपली राजकीय खेळी सुरू केली आहे. आम आदमी पक्षाने (आप) त्याला पंजाबमधून राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. याआधी हरभजन सिंग भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. दरम्यान, पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योत सिद्धूही यांनीही भज्जीला काँग्रेसमध्ये घेण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, भाजप आणि काँग्रेसला धक्का देत भज्जीने 'सेफ गेम' खेळला आणि आम आदमी पक्षात प्रवेश केला.

'आप'मध्ये जाण्याची 3 मोठी कारणे

  1. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भज्जीने मॉडेलिंग आणि अभिनयात नशीब आजमावले. मात्र, त्यात यश मिळाले नाही. त्याच्याकडे फक्त क्रिकेट कॉमेंट्रीचे काम उरले होते. म्हणजेच एक प्रकारे भज्जीच्या राजकीय कारकिर्दीला 'आप'मध्ये सुरक्षित सुरुवात झाली आहे.
  2. हरभजन पंजाबमध्ये क्रिकेट अकादमी चालवतो. त्यामुळे त्याला पंजाबमध्येच राहण्याची इच्छा आहे. येथे त्याला दुहेरी फायदा झाला. तो पंजाबमधून निवडून येत असून येथील सरकारही आम आदमी पक्षाचे आहे.
  3. आम आदमी पक्षामध्ये भज्जीला मोठे राजकीय व्यासपीठ मिळाले आहे. 'आप'मध्ये सध्या अरविंद केजरीवाल यांच्यानंतर कोणताही राष्ट्रीय चेहरा नाही. त्यामुळे भज्जीला राजकीयदृष्ट्या 'आप'मध्ये मोठी संधी मिळू शकते.
हरभजन सिंग यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.
हरभजन सिंग यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.

भाजपपासून दूर का?

  • शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातमून सुरू झालेला भाजप विरोध थांबलेला नाही. पंजाबच्या निवडणुकीत भाजपला 117 पैकी फक्त 2 जागा मिळाल्या आहेत. अशा स्थितीत भज्जीला पंजाबमध्ये भाजपसोबत आपले राजकीय भवितव्य फारसे चांगले दिसत नव्हते.
  • भाजप त्याला उत्तर प्रदेशातून राज्यसभा खासदार करण्याचे आश्वासन देत होते. त्यामुळे पंजाबपासून भज्जीचे अंतर वाढले असते. त्याला पंजाबमध्ये क्रिकेट अकादमीही चालवायची आहे, त्यामुळे तो भाजपसोबत गेला नाही.
  • भाजपमध्ये दिग्गजांची गर्दी आहे. अशा स्थितीत हरभजनचा चेहराही त्यांच्यात हरवून जाईल. राष्ट्रीय पातळीवरील अस्मिता निर्माण करण्याची आणि त्याचे भांडवल करण्याची फारशी संधी भाजपमध्ये मिळली नसती.
नवज्योत सिद्धू यांनी निवडणुकीपूर्वी हरभजन सिंग यांची भेट घेतली होती.
नवज्योत सिद्धू यांनी निवडणुकीपूर्वी हरभजन सिंग यांची भेट घेतली होती.

हरभजनच्या निर्णयाचा फायदा कोणाला?

या निर्णयाचा थेट फायदा आम आदमी पक्षाला झाला आहे. त्यांना राष्ट्रीय स्तरावर मोठा चेहरा मिळाला आहे. अरविंद केजरीवाल हरभजनची क्रिकेट ओळख कॅश इन करतील. दुसरा शीख चेहरा निवडल्याने पंजाबमध्येही चांगला संदेश गेला. एखाद्या खेळाडूला खासदार करून इतर खेळाडूंवर पक्षाचा प्रभाव पडेल. पंजाब सरकार आणि विशेषत: अरविंद केजरीवाल खेळाला गांभीर्याने घेत आहेत, असे त्यांना वाटेल. हरभजन पंजाबमधील क्रीडा पायाभूत सुविधा सुधारण्यास मदत करेल. हरभजनच्या बहाण्याने तरुणांचाही पाठिंबा मिळेल.

पंजाबमधून राज्यसभेसाठी 'आप'च्या 5 उमेदवारांमध्ये अशोक मित्तल, हरभजन सिंग, राघव चढ्ढा, डॉ. संदीप पाठक आणि संजीव अरोरा यांचा समावेश आहे.
पंजाबमधून राज्यसभेसाठी 'आप'च्या 5 उमेदवारांमध्ये अशोक मित्तल, हरभजन सिंग, राघव चढ्ढा, डॉ. संदीप पाठक आणि संजीव अरोरा यांचा समावेश आहे.

राजकीय कारकिर्दीची सुरुवातही 'फिरकी'सारखी

फिरकी गोलंदाज असलेल्या हरभजन सिंगच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवातही फिरकीपेक्षा कमी नव्हती. त्यांची सुरुवातीची चर्चा भाजपशी झाली. पंजाबमध्ये मुख्यमंत्री चेहरा म्हणून त्यांना केंद्रस्थानी ठेवून भाजप निवडणूक लढवण्याच्या तयारीत होती. हरभजन ओबीसी प्रवर्गातून येतो. त्यामुळे भाजपला त्याच्यावर सट्टा खेळायचा होता. मात्र, काँग्रेसने दलित चेहरा चरणजीत चन्नी यांना पुढे केल्यावर भाजपने माघार घेतली. यानंतर काँग्रेस अध्यक्ष नवज्योत सिद्धू यांनी निवडणुकीपूर्वीच हरभजनची भेट घेतली. त्याने निवडणूक लढवावी अशी सिद्धूची इच्छा होती. हरभजननेही काँग्रेसमध्ये प्रवेश करणे अपेक्षित होते. मात्र, जेव्हा काँग्रेसने सिद्धूला बाजूला सारून चरणजीत चन्नी यांना मुख्यमंत्री केले तेव्हा हा खेळ बिघडला.

काँग्रेसमध्ये संधी नसल्याचे पाहून हरभजन आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या संपर्कात आला. हरभजनला निवडणूक लढवायची नव्हती, त्यामुळे निवडणुकीनंतर त्याला राज्यसभेवर पाठवण्याची चर्चा झाली. पंजाबमध्ये 5 जागा रिक्त होत आहेत. 10 मार्च रोजी आपचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर हरभजनने केजरीवाल यांची भेट घेतली आणि ते पंजाबमधून आपचे राज्यसभेचे उमेदवार झाले.

बातम्या आणखी आहेत...