आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काेरोना योद्धा:हिमतीची कथा : डॉक्टरांनी पीपीई किट, फेस शील्ड काढून वाचवला जीव

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. अब्दुल मजिद - Divya Marathi
डॉ. अब्दुल मजिद
  • डॉक्टरने कोरोना रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी स्वत:च्या जिवाचीही पर्वा केली नाही

जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग येथील निवासी डॉक्टर अब्दुल मजिद यांनी कोरोना रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी स्वत:च्या जिवाचीही पर्वा केली नाही. त्यांनी रुग्णावर त्वरित उपचार करण्यासाठी आपल्या अंगावरील पीपीई किट काढली. कारण ज्या रुग्णवाहिकेतून रुग्ण आणला होता. त्यांची समर्पणवृत्ती सांगत आहेत, त्यांचे सहकारी डॉ. श्रीनिवास...

‘रोजच्या प्रमाणे शुक्रवारी आम्ही रुग्णावर उपचार करत होतो. डॉ. जाहिद अब्दुल मजिद यांना एक कोरोना संक्रमित रुग्ण पाहण्यासाठी एम्सच्या ट्रॉमा सेंटरच्या आयसीयूमध्ये शिफ्ट करण्यासाठी बोलावले होते. डॉ. मजिद यांनी अचानक आलेल्या या सूचनेमुळे रोजाही सोडलेला नव्हता. ते रुग्णालयात आले तेव्हा रुग्णवाहिकेतील रुग्णास धड श्वासही घेता येत नव्हता. श्वसन नलिका निघण्याची डॉक्टरांना शंका वाटली. यामुळे त्यांनी पुन्हा नळी बसवण्याचा निर्णय घेतला. कारण यास उशीर झाला तर रुग्णाचा जीवही जाऊ शकतो. रुग्णवाहिकेत डॉ. अब्दुल मजिद यांना अंधूक प्रकाशात दिसतही नव्हते. यामुळे त्यांनी अंगावरील पीपीई किटचा चष्मा आणि फेस शील्ड लगेच काढून टाकला. यामुळे आपल्याला संसर्गाचा धोका होऊ शकतो, याचा त्यांनी थोडाही विचार केला नाही. आता दक्षता म्हणून त्यांना १४ दिवसासाठी क्वारंटाइन राहावे लागले. आपला शत्रू कोरोना आहे, हे लोकांनी समजून घ्यावे. आपसात न भांडता रुग्ण, सहकारी कर्मचारी, आरोग्य सेवा देणाऱ्या परिचारिका व डॉक्टरांना तसेच प्रत्येक व्यक्तीबद्दलही सहानुभूती ठेवली पाहिजे. डॉ. अब्दुल मजिद यांची समर्पण भावना समजू शकतो. आम्ही त्यांच्या सोबत आहोत, असे त्यांनी पवनकुमार यांना सांगितले.

बातम्या आणखी आहेत...