आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The Story Of Ian From Britain, Who Came To India For Charity, Often Overcame Death

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:सुरुवातीला झाला डेंग्यू, नंतर मलेरियातून जीव वाचला, काेराेना विषाणूनेही जखडले, त्यातूनही बरे होताच सापाने दंश केला

जोधपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चॅरिटीसाठी भारतात आलेल्या ब्रिटनच्या इयानची कथा, अनेकदा केली मृत्यूवर मात
  • राजस्थानी कारागिरांची मदत करतात जाॅन्स, ब्रिटनमध्ये करतात वस्तूंची विक्री

ब्रिटनमधून भारतात येऊन धर्मादायाचे काम करणाऱ्या व्यक्तीची ही अशी एक कथा आहे जी ऐकून तुम्हाला धक्का बसेल. राजस्थानात अडकलेल्या या व्यक्तीने एकदा दाेनदा नव्हे तर तिन तिन वेळा मृत्यूशी दाेन हात केले. आपण बाेलत आहाेत इयान जाॅन्सबद्दल. जे काेराेना संसर्गाच्या नियमांमुळे आपल्या मायदेशी परतू शकले नाही आणि राजस्थानातच थांबावे लागले. त्यांची प्रतीक्षा वाढत असतानाच त्यांना सगळ्यात आधी जीवघेणा डेंग्यू झाला. त्यातून बरे हाेत नाही तर मलेरिया झाला. त्यावरही मात करत नाही तर नंतर काेराेना विषाणूच्या जाळ्यात अडकले. काेराेनाला हरवून घरी जाण्याची तयारी सुरू केली तर ९ नाेव्हेंबरला त्यांना साप चावला. १६ नाेव्हेंबरला त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला. इयानवर उपचार करणारे डाॅक्टर अभिषेक तातेर म्हणाले, इयान मागच्या आठवड्यात येथे आले. त्यांना गावात सापाने डंख मारला. आमच्या येथे आले तेंव्हा त्यांना स्पष्ट दिसू शकत नव्हते. चालायला पण त्रास व्हायचा. त्यांच्या मुलाने गाे फंड नावाच्या संकेतस्थळावर माझे बाबा याेद्धा आहेत. भारतात राहताना त्यांना मलेरियाचा ताप आला. नंतर डेंग्यु झाला. डेंग्यू बरा हाेत नाही ताेच ते काेराेना पाॅझिटिव्ह झाले आणि आता त्यांना विषारी साप चावला आहे. पण त्यावरही ते विजय मिळवतील असे आम्हाला मनाेमन वाटते.

राजस्थानी कारागिरांची मदत करतात जाॅन्स, ब्रिटनमध्ये करतात वस्तूंची विक्री

जॉन्स स्थानिक कारागिरांना मदत करतात. त्यांनी बनवलेल्या पारंपरिक हस्तकला वस्तूंची आपल्या चॅरिटी संस्थेद्वारे ब्रिटनमध्ये विक्रीसाठी मदत करतात. या कारागिरांना अडचणीतून मूक्त करण्याचे त्यांचे लक्ष्य आहे काेराेनामुळे जाॅन्सला ब्रिटनला जाता आले नाही, पण एकामागून एक संकटावर मात केल्याने त्याचे कुटुंबीय आनंदी असून त्यांच्या परतण्याची वाट बघत आहेत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser