आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी गुजरातच्या पावागडमधील कालिका माता मंदिरात 500 वर्षांनंतर ध्वज फडकावला. हे मंदिर 11 व्या शतकात बांधण्यात आले होते. 15 व्या शतकात त्याचे शिखर गुजरातच्या महमूद बेगडा नामक सुलतानाने उद्ध्वस्त केले. तसेच त्यावर पीर सदनशाह यांचा दर्गा बांधला. महमूद बेगडाला विषारी सुलतान असेही म्हटले जात होते.
त्यामुळे आजच्या एक्सप्लेनरमध्ये आपण गुजरातचा सुलतान महमूद बेगडा कोण होता? त्याला विषारी सुलतान का म्हटले जात होते? व त्याने कोण-कोणती मंदिरे उद्ध्वस्त केली? हे पाहुया...
बेडगा युद्ध जिंकल्यानंतर राजांना इस्लाम स्विकारण्यास भाग पाडत होता
महमूद बेगडा गुजरातचा सहावा सुलतान होता. त्याचे पूर्ण नाव अबुल फत नासिर-उद-दीन महमूद शाह प्रथम असे होते. वयाच्या 13 व्या वर्षी तो गादीवर बसला. त्यानंतर सलग 52 वर्ष ( 1459-1511) त्याने गुजरातवर राज्य केले. कट्टर मुस्लिम शासक बेगडा विष प्राशन करणे व राक्षसी भोजनासाठी कुख्यात होता.
बेगडा गुजरातच्या सर्वात शक्तिशाली शासकांपैकी एक होता.
बेगडा गुजरातच्या सर्वात ताकदवान शासकांपैकी एक होता. अत्यंत कमी वेळात त्याने जुनागड व पावागड सारख्या भागावर ताबा मिळवला. युद्धात विजय मिळवल्यानंतर तो प्रतिस्पर्धी राजाला बंदी करून त्याला इस्लाम स्विकारण्यास भाग पाडत होता. तसेच नकार दिल्यास त्याला सूळावर चढवत होता.
जीर्णोद्धारानंतर पावागडचे महाकाली मंदिर 30 हजार चौरस फुटांवर पसरले आहे
1472 मध्ये बेगडाने द्वारका मंदिर पाडण्याचे आदेश दिले होते
बेगडावर आपल्या राजवटीत पावागडच्या डोंगरावरील महाकाली मंदिर व द्वारका मंदिर पाडल्याचा आरोप आहे. नागरिकांची हिंदू देवतांवरील श्रद्धा कमी होण्यासाठी 1472 मध्ये बेगडानेच द्वारका मंदिर उद्ध्वस्त करण्याचे आदेश दिले होते. पण, 15 व्या शतकात हे मंदिर पुन्हा बांधण्यात आले.
महमूदला बेगडाची उपाधी गिरनार जुनागड व चम्पानेरचे किल्ले जिंकल्यानंतर मिळाली. त्याच्या राजवटीत अनेक अरबी ग्रथांचे पर्शियन भाषेत भाषांतर करण्यात आले. त्याच्या दरबारात उदयराज नामक एक संस्कृत कवीही होता.
बेगडाच्या संपूर्ण शरीर विषारी होते
बेगडाच्या काळात बाबोसा नामक एक पोर्तुगीज प्रवासी गुजरातमध्ये आला. बाबोसा त्याच्या 'द बुक ऑफ दुराती बाबोसा खंड 1' या पुस्तकात लिहितात की, बेगडा लहानपणापासूनच विष प्राशन करत होता. त्याला कुणीही विष देऊन ठार करु नये, अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती.
त्यामुळे बालपणापासूनच त्याला जेवणाबरोबर थोडेथोडे विष दिले जायचे. कालांतराने त्याचे संपूर्ण शरीर विषारी बनले. त्या काळी बेगडाच्या अंगावर बसलेल्या माशीचाही मृत्यू व्हायचा असे सांगितले जाते. एवढेच नाही तर त्याच्यासोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्या मुली व महिलांचाही बळी जात होता.
इटालियन प्रवासी लुडोविको डी वर्थेमा यांच्या 'इटिनेरिओ डी लुडोइको दि वर्थेमा बोलोग्नीस' या पुस्तकात बेगडाच्या विषाक्ततेचा उल्लेख आहे. वर्थेमा सांगतात की, बेगडाला एखाद्याचा जीव घ्यायचा असेल तर तो त्या व्यक्तीचे कपडे काढून त्याच्यापुढे पानसुपारी खायचा. त्यानंतर त्या व्यक्तीच्या अंगावर थुंकायचा. असे केल्याने अर्ध्या तासातच सदर व्यक्तीचा मृत्यू होत असे.
मिशा डोक्यावर बांधत होता
बेगडा आपल्या लांबलचक मिशांमुळेही खूप प्रसिद्ध होता. त्याच्याविषयी पोर्तुगीज प्रवाशी सांगतात की, त्याच्या मिशा एवढ्या लांब व रेशमी होत्या की तो त्यांना आपल्या डोक्यावर बांधत होता. कंबरेपर्यंत लोंबणारी दाढीही त्याला प्रिय होती. अशी दाढी असणाऱ्या लोकांचा तो सन्मान करत होता. त्याच्या मंत्रिमंडळातील अनेकांना अशी लांबचलत दाढी होती.
असे म्हटले जाते की, महमूद बेगडा जेवण करण्याच्या बाबतीत एकदम राक्षस होता. तो दिवसभरात 35 किलो अन्न खात होता. ्यात मिठाई, गोडभात, मध व तुपाचा समावेश होता. बेगडा एका दिवसात 12 डझनांहून अधिक केळी खात होता. ही अतिषयोक्ती वाटते. पण, बेगडाची भूक महाकाय असल्यामुळेच अशा दंतकथा पसरल्या असाव्यात हे मानायला वाव आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.