आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The Student Made The Taj Mahal Out Of 3 Lakh Sticks Of Firebox; Breaks Iran 's 7 year old Record

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पश्चिम बंगाल:विद्यार्थिनीने आगपेटीच्या 3 लाख काड्यांपासून साकारला ताजमहाल; इराणचा 7 वर्षे जुना विक्रम मोडला

नदिया7 महिन्यांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • 22 वर्षीय सहेली म्हणते, आजोबा व वडिलांचा वारसा जोपासायचा आहे. दोघेही राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित

पश्चिम बंगालमधील नदिया जिल्ह्यातील २२ वर्षीय सहेली पालने आगपेटीच्या तीन लाख काड्यांपासून ताजमहालाची प्रतिकृती साकारली आहे. सहेलीच्या या कलाकृतीमुळे इराणचा ७ वर्षे जुना विक्रम मोडीत निघाला आहे. २०१३ मध्ये इराणच्या मेसम रहमानीने आगपेटीच्या १,३६,९५१ काड्यांपासून युनेस्कोचा लोगो बनवला होता.

कृष्णानगरमधील घुरनी परिसरातील राहणारी सहेली पाल कोलकाता विद्यापीठात एमए इंग्रजीची विद्यार्थिनी आहे. तिने ६ फूट लांब व ४ फूट रुंद बोर्डवर हा ताजमहाल बनवला आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या दिशानिर्देशांनुसार ऑगस्टच्या मध्यात ही कलाकृती तयार करणे सुरू केले होते, जी ३० सप्टेंबरला पूर्णत्वास आली. सहेली म्हणाली, ताजमहालाची झलक दिसण्यासाठी आगपेटीच्या दोन रंगांच्या काड्या यासाठी वापरल्या आहेत.

दुर्गामातेच्या चेहऱ्याच्या सर्वात छोट्या मूर्तींचाही विक्रम नावावर

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनुसार, सहेलीने २०१८ मध्ये दुर्गामातेच्या चेहऱ्याची सर्वात लहान मूर्ती बनवण्याचा जागतिक विक्रम केला होता. सहेलीचे आजोबा बिरेन पाल व वडील सुबीर पाल या दोघांनाही अनुक्रमे त्यांच्या शिल्पांसाठी १९९१ व १९८२ मध्ये राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे.

बातम्या आणखी आहेत...