आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Supreme Court Adjourned The Hearing Until April 11; Petition Filed By Akali Leader Seeking Cancellation Of Drug Case

बिक्रम मजिठियाला SC कडून दिलासा नाही:सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी 11 एप्रिलपर्यंत पुढे ढकलली; अकाली नेत्याकडून ड्रग्ज केस रद्द करणारी याचिका दाखल

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाब पोलिसांनी माजी कॅबिनेट मंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते बिक्रम सिंग मजिठिया यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. त्यांच्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून ती 17 एप्रिल रोजी होईल. मोहालीमध्ये ड्रग्ज केस रद्द करण्याची याचिका मजिठियाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. सध्या मजिठिया हे पटयाला सेंट्रल तुरुंगात असून त्यांना जामीन मिळालेला नाही.

ज्या स्पेशल टास्क फोर्स (STF) रिपोर्टच्या आधारवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यासोबत कौटुंबीक वाद सुरू असल्याचा तर्क मजठियाने सर्वोच्च न्यायालयात दिला. तसेच हा गुन्हा फक्त निवडणुकीमुळे आपल्याला फसवण्यासाठी दाखल केल्याचे ते म्हणाले.

बिक्रम मजिठिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामीन मागितला होता. त्यावर सर्वोच्च न्यायालायने त्यांना निवडणूक होईपर्यंत म्हणजेच 24 फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून दिलासा दिला. 24 फेब्रुवारीनंतर मजिठिया यांनी मोहाली न्यायालयात आत्मसमर्पण केले. येथून त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली. यावेळी त्यांनी जामीन मागितला. पण, गुन्हा दाखल झालेल्या कलमांमुळे त्यांना कनिष्ठ न्यायालयाने जामीन दिला नाही.

मान सरकारने बदलली SIT -
पंजाबमध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर CM भगवंत मान यांच्या आप सरकारने या प्रकरणातील चौकशी टीम बदलवली. नवी टीम IG गुरशरन सिंह संधू यांच्या सुपरव्हिजनमध्ये काम करत आहे. यात SIT प्रमुख IPS अफसर एस. राहुल हे आहेत. तर या टीमध्ये AIG रणजीत सिंग ढिल्लो, DSP रघुवीर सिंग आणि DSP अमरप्रीत सिंग यांचा समावेश आहे. आधीच्या एसआयटीमध्ये AIG बलराज सिंग यांच्या नेतृत्वात बनवण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...