आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Supreme Court Dismissed The Petition Of 14 Opposition Parties, Alleging Abuse Of Process

सुनावणी:सुप्रीम कोर्टाने 14 विरोधी पक्षांची याचिका फेटाळली, यंत्रणा दुरुपयोगाचा केला होता आरोप

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सीबीआय आणि ईडीसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा मनमानी वापर होत असल्याबद्दल काँग्रेसच्या नेतृत्वातील १४ विरोधी पक्षांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. कोर्टाने या याचिकेत रस न दाखवल्यामुळे विरोधकांचे वकील अॅड. अभिषेक मनू सिंघवी यांनी ती मागे घेतली. यात विरोधकांनी अटक, कोठडी आणि जामिनाबाबत नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याची मागणी केली होती.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पीठ म्हणाले, राजकीय नेते या देशातील नागरिकांच्या समानच आहेत. त्यांच्यासाठी वेगळ्याने मार्गदर्शक तत्त्वे तयार केली जाऊ शकत नाहीत. विशेष प्रकरणाच्या तथ्यांविना सामान्य मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करणे शक्य नाही. तुमच्याकडे वैयक्तिक गुन्हेगारी प्रकरण असेल तरच आमच्याकडे या. प्रकरणातील तथ्यांशी संबंध न ठेवता सामान्य मार्गदर्शक तत्त्वे देणे धोकादायक ठरेल.