आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
काेरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची अखंड सेवा सुरू आहे. त्यांना ८ महिन्यांपासून ब्रेक नाही. हे डॉक्टर्स आहेत, भांडी नव्हेत, अशा शब्दांत सुप्रीम कोर्टाने केंद्राला फटकारले. न्या. अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील न्यायपीठाने म्हटले आहे की, या मुद्द्यावर सरकारने विचार करावा. या लोकांच्या मानसिकतेकडे सरकारला लक्ष द्यावे लागेल. यावर सॉलिसिटर जनरल (एसजी) तुषार मेहता यांनी सुप्रीम कोर्टाला हमी दिली की, कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना ब्रेक देण्याच्या मुद्द्यावर लवकरच विचार केला जाईल. आगीपासून सुरक्षेसंबंधी उपायांबाबत सुनावणीदरम्यान हा विषय आला होता. कोर्टाने नमूद केले की, सलग काम करणे अत्यंत कठीण आहे. याचा मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. या एकूण मुद्द्यांवर शुक्रवारी आदेश दिला जाईल, असे न्यायपीठाने नमूद केले.
८ महिन्यांपासून सुटी घेतली नाही, अनेकदा १४ तासांची ड्यूटी; ८२ वर्षीय आईची भेट घेतली नाही
८ महिन्यांपासून सुटी घेतली नाही. आतापर्यंत आपल्या ८२ वर्षीय आईलाही भेटले नाहीत. मोठा भाऊ आणि इतर नातेवाईक कोरोना संक्रमित होऊन ठीक झाले, पण कोणाला भेटू शकले नाहीत. अनेकदा १४ तास ड्यूटी करतात. राज्याच्या इतर भागांतही जावे लागते. घरात पत्नी आणि मुलगी आहे, पण घरात वेगळ्या भागात राहतात. ते म्हणाले,‘कुणा एकाचेही प्राण वाचवले तरी आयुष्य यशस्वी आहे, असे वाटते. पीडितांना मदत करू शकलो याचा आनंद आहे.’
- डॉ. राजीव मिश्रा, स्टेट नोडल ऑिफसर, आयुष, मप्र
होस्टेलमध्ये राहिले, नंतर कुटुंब झारखंडला नेले, अनेक वेळा रुग्णांचे समुपदेशनही केले
दिल्ली एम्स ट्राॅमा सेंटरमधील कोरोना रुग्णालयात ड्यूटी आहे. सुरुवातीला कुटुंबीयांना संक्रमणापासून वाचवण्यासाठी काही काळ होस्टेलमध्ये राहिले. कुटुंब दिल्लीहून झारखंडला शिफ्ट केले. ते म्हणाले,‘माझ्यामुळे मित्र-नातेवाइकांना संसर्ग झाला तर, अशी आधी भीती होती. दोन महिन्यांपूर्वीच कुटुंबाला पुन्हा दिल्लीला बोलावले. ड्यूटीदरम्यान १२ तास पीपीई किट घालावे लागते. अनेक वेळा घाबरलेल्या रुग्णांचे समुपदेशनही करावे लागते.’
- डॉ. शैलेंद्र कुमार, सहयोगी प्राध्यापक एम्स, दिल्ली
आयुष, होमिओपॅथी डॉक्टर कोरोनावर उपचार करू शकत नाहीत, इम्युनिटी बूस्टर देऊ शकतात
केरळ उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी आदेश दिला की, होमिओपॅथी,आयुर्वेद या वैद्यकीय पद्धतीचा वापर कोरोनाचा धोका कमी करण्यासाठी केला जाऊ शकतो, पण ही उपचाराची अचूक प्रक्रिया आहे असे सांगणे चुकीचे आहे. या पॅथीतील डॉक्टर कोरोनावर उपचाराच्या जाहिराती करू शकत नाहीत. पण रुग्णांना इम्युनिटी बूस्टरसाठी औषधे लिहून देऊ शकतात. या क्रमात ६ मार्चला आरोग्य मंत्रालयातर्फे काही औषधी इम्युनिटी बूस्टर म्हणून निश्चित करण्यात आल्या होत्या. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.