आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदरशांचे शाळेत रूपांतर:सर्वोच्च न्यायालयाने आसाम सरकारला नोटीस बजावली

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य सरकार संचालित मदरशांचे नियमित शाळेत रूपांतर करण्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आसाम सरकारला नोटीस बजावली आहे. गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधातील एका याचिकेवर आसाम सरकारकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.

राज्य सरकार संचालित मदरशांचे सर्वसाधारण शाळांत रूपांतर करण्यासंबंधी २०२० मध्ये आसाम विधानसभेत कायदा पारित केला होता. तो गुवाहाटी उच्च न्यायालयातही कायम राहिला. त्या निकालास सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. हा कायदा अल्पसंख्याकांच्या हक्कांची पायमल्ली करणारा असल्याचा आरोप याचिकेत केला आहे.

बातम्या आणखी आहेत...