आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The Supreme Court Slammed The Maharashtra Government Over The Plight Of The Workers

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मजुरांचे स्थलांतर:मजुरांच्या दुर्दशेबद्दल सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला फटकारले

नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मजुरांच्या वास्तविक स्थितीचा अहवाल द्या

काेराेना महामारीच्या काळात स्थलांतरित कामगारांच्या दुर्दशेसंदर्भात सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर न केल्याबद्दल सर्वाेच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले. राज्य सरकारवर ताशेरे आेढतानाच पुढील आठवड्यात स्थलांतरित कामगारांच्या वास्तविक स्थितीबाबत तपशीलवार अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. पुढील सुनावणी १७ जुलैला होईल.

महाराष्ट्र सरकारबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करताना न्या. अशोक भूषण यांनी साॅलिसिटर जनरल तुषार मेहता यांना राज्यात परतण्याच्या प्रतीक्षेतील कामगारांची सविस्तर माहिती देण्याचे निर्देश दिले. सर्व स्थलांतरित कामगारांच्या भोजनाची व्यवस्था केली, असे तुमचे प्रतिज्ञापत्र सांगते. प्रत्यक्ष स्थिती वेगळी आहे, असेही त्यांनी सुनावले. कोरोना काळात लॉकडाऊनच्या स्थितीत उद्योग, रोजगार बंद झाल्यावर परराज्यातील हजारो मजूर महाराष्ट्रातून परतत होते. या प्रवासात मजुरांचे प्रचंड हाल झाले होते. याबाबत माध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी स्वत:हून दखल घेतली होती. त्यानंतरच्या सुनावणीत मजुरांचे होणारे हाल आणि राज्य सरकारची जबाबदारी यावरून न्यायालयाने कठोर शब्दांत फटकारले.

बातम्या आणखी आहेत...