आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
‘कोरोना संसर्गाची स्थिती गंभीर होत आहे. विशेषत्वाने दिल्ली, गुजरातमध्ये स्थिती नियंत्रणाबाहेर आहे. असेच सुरू राहिल्यास डिसेंबरमध्ये याहूनही वाईट स्थितीसाठी तयार राहा,’ अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केंद्र आणि राज्य सरकारांच्या प्रयत्नांवर केली. कोर्टाने सर्व राज्ये आणि केंद्राकडून संसर्गाचे ताजे आकडे तसेच स्टेटस रिपोर्टही मागवला. खंडपीठ कोरोना रुग्णांवरील उपचार आणि मृत्यू झालेल्यांच्या मृतदेहांवर सन्मानाने अंत्यसंस्कार करण्याशी संबंधित प्रकरणात सुनावणी करत होते. न्यायालयाने या प्रकरणात स्वत: दखल घेत सुनावणी सुरू केली आहे. पुढील सुनावणी २७ नोव्हेंबरला हाेणार आहे.
प्रत्येक सरकारला घेरले, कोर्टाने सर्वांना विचारले प्रश्न..
केंद्र सरकार : कोर्टाने विचारले-‘कोरोनाची स्थिती काय आहे? तुम्ही कोणती पावले उचलत आहात? हे शपथपत्र देऊन सांगा.’
- सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, केंद्र सर्व राज्यांसोबत मिळून प्रयत्न करत आहे.
दिल्ली : ‘दोन आठवड्यांपासून भयावह बातम्या येत आहेत. सरकार काय करत आहे?’
- दिल्ली सरकार -‘रुग्णालयांत ८० % बेड राखीव आहेत. मास्क न घातल्यास दंड वाढवला आहे.
गुजरात : ‘तुम्ही दिवसा लग्न समारंभास परवानगी दिली आहे. हे काय चालले आहे?’
- कोर्टाने गुजरात सरकारचे प्रयत्न अपुरे असल्याचे सांगितले.
महाराष्ट्र : ‘ तुमच्याकडे स्थिती अत्यंत गंभीर आहे. ही आत्मपरीक्षणाची वेळ आहे. संसर्ग वाढत आहे, डिसेंबरमध्ये आणखी वाईट स्थितीसाठी तयार राहावे.’
- महाराष्ट्र सरकारच्या वकिलानेही उपाययोजनांचा तपशील दिला. कोर्टाने त्या अपुऱ्या असल्याचे म्हटले.
कोरोना चाचण्या, सुविधांचे समान शुल्क निश्चित करा
न्यायालयाने केंद्राला निर्देश दिले की, संपूर्ण देशभर कोरोना चाचण्या आणि इतर सुविधांसाठी समान शुल्क निश्चित करावे. तसेच कोरोना रुग्णांसोबत त्यांचा नातेवाईक स्वेच्छेने राहत असेल तर त्याला त्यासाठी परवानगी दिली जावी. त्यासाठी रुग्णालयांना वेगळी व्यवस्था करण्यास सांगावे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.