आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Survey Will Start From Today, The Supreme Court's Refusal To Stay, Videography Will Start At 8 Am

ज्ञानवापी वाद:​​​​​​​ आजपासून सर्वेक्षण सुरू होणार, सुप्रीम कोर्टाचा स्थगितीला नकार, सकाळी 8 वाजता सुरू होईल व्हिडिओग्राफी

नवी दिल्ली/वाराणसी7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाराणसीतील ज्ञानवापी मशीद-शृंगार गौरी मंदिर वादात शनिवारपासून पुन्हा सर्वेक्षण सुरू होऊ शकते. सुप्रीम कोर्टाने याप्रकरणी स्थगिती देण्यास नकार दिला आहे. ज्येष्ठ वकील हुजैफा अहमदी यांनी अंजुमन इंतजामियाच्या वतीने शुक्रवारी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. यात कोणत्याही परिस्थितीत १७ मेपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या वाराणसी कोर्टाच्या आदेशाला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली होती. अहमदी यांनी आपल्या युक्तिवादात म्हटले की, वाराणसी कोर्टाने पूजास्थळ अधिनियमानुसार संरक्षित स्थळाच्या संपत्तीच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. ज्ञानवापी प्राचीन काळापासून मशीद असून हे पूजास्थळ अधिनियमांतर्गत सर्वेक्षणासाठी स्पष्टपणे प्रतिबंधित आहे. यावर सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा म्हणाले की, आम्ही त्वरित कोणताही आदेश देऊ शकत नाही. फाइल बघितल्यानंतरच सुनावणीवर निर्णय घेतला जाईल. सुप्रीम कोर्ट या प्रकरणाची सुनावणी पुढील आठवड्यात करू शकते. वाराणसीच्या दिवाणी न्यायालयाने ज्ञानवापी परिसराच्या कानाकोपऱ्याची व्हिडिओग्राफी करण्यास आणि १७ मेपर्यंत कोर्टासमोर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळी ८ वाजता सुरू होईल व्हिडिओग्राफी
वाराणसी कोर्टाच्या निर्णयानंतर गुरुवारी अॅडव्होकेट कमिशनर आणि जिल्हाधिकाऱ्यांची बैठक झाली. यात १४ मे रोजी व्हिडिओग्राफीचे काम सकाळी ८ वाजता सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी दोन्ही पक्षांना परिसरातील गेट नं. ४ वर बोलावण्यात आले. यासाठी दोन्ही पक्षांना शुक्रवारी नोटिसा देण्यात आल्या.

बातम्या आणखी आहेत...