आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The Taj Mahal Opened After 188 Days, 1235 Tourists Visited; 4 Lakh People Will Get Employment Again

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ताज पुन्हा गजबजणार:188 दिवसांनंतर ताजमहाल उघडला, 1235 पर्यटकांची भेट; 4 लाख लोकांना पुन्हा रोजगार मिळणार

आग्रा8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ताजमहालास एका दिवसात जास्तीत जास्त ५ हजार व आग्र्याच्या किल्ल्यास २५०० पर्यटकांना प्रवेश मिळेल

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे असलेला ताजमहाल व आग्र्याचा किल्ला सोमवारपासून पर्यटकांसाठी उघडला. ही दोन्ही स्थळे १७ मार्चपासून बंद होती. १८८ दिवसांनंतर ताजमहाल पाहण्यासाठी १२३५ पर्यटक आले होते. यापैकी १२१५ भारतीय व २० परदेशी पर्यटक होते. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या (एएसआय) अधिकाऱ्यांनी ही दोन्ही स्थळे सुरू करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केली आहे. येथे भेट देण्यास आलेल्या पर्यटकांना कोविड-१९ च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागणार आहे. ताजमहालास एका दिवसात जास्तीत जास्त ५ हजार व आग्र्याच्या किल्ल्यास २५०० पर्यटकांना प्रवेश मिळेल. पर्यटकांना ताजमहालात फक्त शहाजहान व मुमताज यांची कबर पाहता येणार आहे. परंतु मकबऱ्यात एकावेळी ५ पर्यटकांना जाता येणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सीआयएसएफ पर्यटकांच्या चाचण्या करेल. समाधानाची बाब म्हणजे दोन्ही स्थळे सुरू झाल्याने चार लाख लोकांना रोजगार मिळण्याची आशा आहे.

> पार्किंगसह सर्व पेमेंट डिजिटल मोडवर करावे लागतील.

> भिंती व रेलिंगपासून दूर उभे राहावे लागेल.

> पर्यटकांनी मास्क वापरणे, फिजिकल डिस्टन्सिंग ठेवणे बंधनकारक आहे.

> तिकिटाच्या खिडक्या बंद असतील. ऑनलाइन तिकिटांवर प्रवेश मिळेल.

मार्बल इनले आणि जरदोजीमुळे ५३५ कोटींचा व्यवसाय

जरदोजी असोसिएशनचे संस्थापक फैजानुद्दीन यांनी सांगितले, ताजमहाल सुरू झाल्याने उद्योग जगतात असलेली नकारात्मकता संपेल. सोबत ४ लाख लोकांना पुन्हा रोजगार मिळेल. आग्र्यात मार्बल इनले, जरदोजी, रेस्तराँ व तिन्ही व्यवसाय पर्यटनावर अवलंबून आहेत. यामुळे सुमारे ५३५ कोटी रु.चा व्यवसाय होतो.

बातम्या आणखी आहेत...