आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Taliban Are Looking For Educated Girls From House To House; Saying We Will Rape You And Kill You

काबूलमधील अमेरिकन विद्यापीठाच्या विद्यार्थ्यीनींना भीती:तालिबानी घरोघरी सुशिक्षित मुलींना शोधत आहेत; आम्ही तुमच्यावर बलात्कार करु आणि मारुन टाकू अशी दिली जातेय धमकी

नवी दिल्ली22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अनेक मुली घरात लपल्या, प्रत्येक क्षणी तालिबानची भीती

अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तान पूर्णपणे सोडले आहे आणि आता काबूल विमानतळासह संपूर्ण राजधानी तालिबानच्या ताब्यात आहे. गेल्या 20 वर्षात अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये आपल्या शिक्षण पद्धतीद्वारे नवीन पिढी तयार करण्याचा प्रयत्न केला होता. या हेतूने राजधानी काबुलमध्ये अमरिकन यूनिव्हर्सिटीची स्थापना करण्यात आली होती. ज्यामध्ये पश्चिमी शिक्षण दिले जात होते.

अफगाणिस्तानातील विद्यार्थीनी आणि विद्यार्थ्यांमध्ये या विद्यापीठाची क्रेझ होती, पण आता अमेरिका गेल्यानंतर या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना आणि विशेषतः मुलींना धोका जाणवत आहे. बीबीसीच्या एका पत्रकारने एका ट्विटमध्ये दावा केला आहे की, तालिबानने अमेरिकन विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींवर बलात्कार करून त्यांना ठार मारण्याची धमकी दिली आहे.

बीबीसीच्या पत्रकारने लिहिले, 'काबुलमधील अमेरिकन विद्यापीठातील विद्यार्थी म्हणतात की तालिबानला त्यांची नावे आणि घरचे पत्ते माहित आहेत. एका विद्यार्थ्याला हा मेसेज आला आहे, ज्यात लिहिले आहे - तु अमेरिकन युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होती आणि सरकारसाठी काम करत होती. जरा थांबा, आम्ही तुमच्याकडे देखील लक्ष देऊ' दुसर्‍या संदेशात या मुलीला सांगण्यात आले आहे - 'आम्ही तुझ्यावर बलात्कार करू आणि तुला ठार मारू.'

अनेक मुली घरात लपल्या, प्रत्येक क्षणी तालिबानची भीती
दैनिक भास्करने काबूल आणि अफगाणिस्तानच्या इतर भागात ज्या मुलींशी बातचित केली, त्या लपून राहत आहेत आणि खूप घाबरल्या आहेत. त्याच अमेरिकन युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थीनीने भास्करला सांगितले, 'मला कसे वाटते हे मला माहित नाही. ऑगस्टमध्ये माझा साखरपुडा झाला आहे. मी माझ्या मंगेतरशी देखील बोलत नाही. मी काय सांगू, मी काय समजावून सांगू? मला भीती वाटतेय की, काय होतेय याचा मी विचार केला तर मी पागल होईल'

जर तालिबानने मला पाहिले तर उचलून नेतील
काबूलच्या एका भागात लपून राहत असलेली दुसरी विद्यार्थीनी म्हणाली की, 'मी माझ्या खिडकीतून बाहेरही पाहत नाही. जर तालिबान्यांनी मला पाहिले तर ते मला उचलून नेतील. ते सुशिक्षित मुलींना लक्ष्य करू शकतात.

अमेरिकन सैन्य काबूलमधून परतल्यानंतर मुलींना धोका वाढला आहे. हजारो अफगाण मुलींनी पाश्चात्य देशांमध्ये आश्रय मागितला, पण सर्वांनाच देशातून नेता आलेले नाही. आता या सर्व लपलेल्या आहेत आणि खूप घाबरल्या आहेत. अशाच एका मुलीने भास्करसोबत बोलताना सांगितले, 'पुढे काय होईल हे आम्हाला माहीत नाही. आता आमच्याकडे आशेशिवाय काहीच नाही.'

शरियतच्या आधारावर महिलांना अधिकार देण्याचे तालिबानने म्हटले आहे
महिलांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाईल आणि कोणालाही लक्ष्य केले जाणार नाही, असे तालिबानने म्हटले आहे. तालिबानने असेही म्हटले आहे की, महिलांना शरियतमध्ये मिळालेले त्यांचे अधिकार दिले जातील. काही शाळांचे फोटो देखील तालिबान समर्थकांनी व्हायरल केले आहेत, ज्यात मुली शाळेत आहेत आणि महिला बाजारात फिरत आहेत. मात्र, ही चित्रे कधी घेतली गेली, याची पुष्टी होऊ शकली नाही.

बातम्या आणखी आहेत...