आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Taliban Are Very Terrorist, They Will Selectively Kill Our People; Modi Ji, Save Us, We Want To Live; News And Live Updates

दिल्लीतील अफगाणांची मोदींना विनंती:​​​​​​​आमच्या कुटुंबातील सदस्यांनी तालिबानविरुद्ध अफगाण सैन्याला केली होती मदत, ते आता त्यांना निवडून मारतील; मोदीजी आम्हाला वाचवा!

​​​​​​​नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रत्येक ठिकाणी विनंती केली, परंतु माझे कोणीच ऐकले नाही

भारताचा शेजारील देश अफगाणिस्तान सध्या सर्वात मोठ्या संकटातून जात आहे. तालिबान्यांनी संपूर्ण अफगाणिस्तानावर ताबा मिळवला असून यामुळे देशात दहशतीचे वातावरण आहे. याचा मोठा परिणाम भारतावर ही दिसत आहे. भारत देशात राहणाऱ्या अफगाणी लोकांना आपल्या कुटुंबांची चिंता लागत आहे. कारण आमच्या कुटुंबातील सदस्यांनी तालिबानविरुद्ध अफगाण सैन्याला मदत केल्याने ते त्यांना निवडून मारतील असं भारतातील अफगाण लोकांचे म्हणणे आहे. दिल्लीच्या चाणक्यपुरीमध्ये अमेरिका, रशिया, अफगाणिस्तानसह सर्व देशांचे दूतावास आहेत.

दिल्लीतील या निवासस्थानी शुक्रवारी सकाळी थोडी हालचाल पाहायला मिळाली. अफगाणिस्तान दूतावासाच्या बाहेर लोकांचे मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरु होते. दरम्यान, कुर्ता पायजमा घातलेले पुरुष आणि हिजाब घातलेल्या मुली आणि स्त्रिया रडत रडत त्यांच्या तक्रारी घेऊन इथे पोहोचल्या होत्या. या लोकांच्या चेहऱ्यावर तालिबानची भीती आणि चिंतेच्या रेषा स्पष्ट दिसत होत्या. दिव्य मराठीच्या प्रतिनिधीने या लोकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तुम्हीदेखील त्या संभाषणातील प्रमुख अंश वाचू शकता...

प्रत्येक ठिकाणी विनंती केली, परंतु माझे कोणीच ऐकले नाही
अफगाणिस्तानातील फरिश्ता रहमानी आपल्या बहिणीसोबत भारतात एक वर्षापासून राहत आहे. ती भारत देशात निर्वासित म्हणून राहते. फरिश्ताची आई अफगाणी सैन्यात होती. यामुळे तालिबान्यांनी तीच्या वडिलांना गेल्या वर्षी ठार केले. तेंव्हापासून तीची आई नैराश्यात जीवन जगत होती. अफगाणिस्तानातील परिस्थिती बिघडल्यानंतर त्याला भारतात यावे लागले. परंतु, भारतातही त्यांचे आयुष्य मोठ्या अडचणीत जात आहे.

फरिश्ता सांगते की, आम्हाला अशा परिस्थितीत काय करावे कळत नाही आहे. आम्हाला काहीतरी मदत मिळावी म्हणून मी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगापासून अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया आणि अनेक दूतावासांना विनंती केली. अनेक ईमेल पाठवले. परंतु, कोठेही आमचे ऐकले जात नाहीये असं तीने म्हटले आहे.

अमेरिका आणि भारताकडून काय अपेक्षा आहेत? असं विचारल्यावर ती म्हणते की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्या जीवनाचा आदर करायला हवा. आम्हाला जगायचं आहे. तालिबानी दहशतवादी मोठे क्रुर आहेत. ते आमच्या कुटुंबांतील सदस्यांना जीवे मारल्याशिवाय सोडणार नाहीत. विशेष म्हणजे ज्या लोकांनी अफगाणी सैन्यांसोबत काम केले आहे किंवा त्यांना मदत केली आहे, अशा लोकांना निवडून ते मारतील अशी भीती फरिश्ताने बोलताना व्यक्त केली.

सुरक्षा दलाचे जवान दिल्लीतील अफगाणिस्तान दूतावासाच्या बाहेर उभे आहेत.
सुरक्षा दलाचे जवान दिल्लीतील अफगाणिस्तान दूतावासाच्या बाहेर उभे आहेत.

मुली घराच्याबाहेर निघत नाहीये
ती बोलताना पुढे म्हणाले की, तालिबान्यांच्या भीतीपोटी काबूल विमानतळावर मोठी गर्दी जमत आहे. विमानात जेथे जागा मिळेल तेथे बसून लोक प्रवास करत आहे. अफगाणिस्तानात एवढे भीतीचे वातावरण आहे की, मुली घराच्याबाहेर देखील निघत नाहीयेत. 20 वर्षांपूर्वी जेव्हा अमेरिकेचे सैन्य अफगाणिस्तानात आले, तेंव्हापासून अफगाणिस्तानात सुरक्षा वाढली. देशाचे पंतप्रधान अशरफ घनी यांनी आमच्या प्रदेशाला पाकिस्तानाला विकून टाकले. तेंव्हापासून आमच्या देशात मोठ्या प्रमाणात दहशतवादी कारवाया होत असल्याचे फरिश्ताने सांगितले.

तालिबानच्या राजवटीत काम करणे कठीण
काबूलचा रहिवासी शाहिद म्हणतो की, अमेरिकेने जाणूनबुजून आमच्याशी हे केले आहे. त्यांना वाटले असते तर त्यांनी तालिबान्यांना अफगाणिस्तानावर ताबा मिळवू दिला नसता. शाहिद सध्या अफगाणिस्तान सरकारमध्ये कर्मचारी आहे. तो 1 जुलै रोजी मेडिकल व्हिसावर भारतात आला होता. तो व्हिसा फक्त 30 दिवसांसाठी असून व्हिसाचा कार्यकाळ संपला असल्याने तो दु:खी आहे. तो आपल्या देशात परत जाऊ शकत नाही. कारण तालिबानी राजवाटीत त्यांचे काय होईल. कसे होईल हे काही कळत नसल्याचे शाहिदने म्हटले आहे. दरम्यान, त्यांना अफगाणिस्तानातील नातेवाईकांची चिंता सतावत असल्याचे म्हटले आहे.

काबूलचा रहिवासी शाहिद म्हणतो की, अमेरिकेने हे जाणूनबुजून आमच्याशी केले आहे. त्यांना हवे असते तर ते तालिबानला रोखू शकले असते.
काबूलचा रहिवासी शाहिद म्हणतो की, अमेरिकेने हे जाणूनबुजून आमच्याशी केले आहे. त्यांना हवे असते तर ते तालिबानला रोखू शकले असते.

घरमालक घर सोडण्यासाठी दबाव टाकत आहे
अफगाणिस्तानची रहिवासी नजमा (नाव बदलले आहे) तीन वर्षांपूर्वी बिघडलेली परिस्थिती आणि तालिबानच्या भीतीमुळे भारतात आली होती. परंतु, तीचे नातेवाईक अजूनही अफगाणिस्तानात अडकले आहेत. जेव्हापासून अफगाणिस्तानमधील परिस्थिती बिकट झाली आहे, तेव्हा त्यांना भारतातही समस्या भेडसावत आहेत. तीला आपली ओळख सार्वजनिक करण्याची भीती वाटत आहे.

नजमा म्हणते की, माझे नातेवाईक अफगाणिस्तानात अडकले आहेत. मी सगळीकडे मदतीचे याचिना करत आहे, परंतु मला कोणीही मदत करत नाही.
नजमा म्हणते की, माझे नातेवाईक अफगाणिस्तानात अडकले आहेत. मी सगळीकडे मदतीचे याचिना करत आहे, परंतु मला कोणीही मदत करत नाही.

कारण तीने आपली ओळख सार्वजनिक केली तर तालिबानी दहशतवादी त्यांच्या नातेवाईकांना मारुन टाकतील. अफगाणिस्तानात परिस्थिती बिकट झाल्यामुळे नजमाच्या घरमालकाने तिचा पाणीपुरवठा खंडित केला आहे. आणि तीला घर सोडण्यासाठी दबाव टाकत असल्याचे म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...