आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आत्मनिर्भर:मलालासारखी हरिवा; मुलांसारखे केस ठेवल्याने तालिबान्यांचा ससेमिरा, काबूलमध्ये संघर्ष करणार

नवी दिल्ली ( मुकेश कौशिक )10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जेएनयूतून पदव्युत्तर पदवी घेऊन परतणाऱ्या मुलीची कहाणी

पळ हरिवा, हरिवा पळ... तालिबानी अत्याचाराचा हा आवाज आज तिच्या कानात घुमतोय. हरिवा पुुन्हा अफगाणिस्तानच्या त्याच गल्ल्यांमध्ये परतणार आहे. जेथून पळून ती दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात आली होती. तिने पर्यावरणात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. एक वर्षाची असतानाच वडिलांना गमावणारी हरिवा सांगते, आईने आम्हा ६ बहिणींना एकटीने सांभाळले. तालिबानी कायद्यात महिलांना काम करण्याची मनाई होती. यामुळे तिच्या दोन इंजिनिअर बहिणींना घरी बसावे लागले. बहिणींनी घरी शिवणकाम करून उपजीविका चालवली. हरिवा सांगते, मी ७ वर्षांची असताना मुलासारखे केस कापले. एके दिवशी सलूनमध्ये केस सेट करायला गेले असता कानातील रिंग पाहून २ तालिबान्यांना माझ्यावर शंका आली. केस कापणाऱ्याने मला पळण्याचा इशारा केला. मी पळाले आणि एका विहिरीत उडी मारून प्राण वाचवला. तालिबानी मला पकडू शकले नाहीत. मात्र केस कापणाऱ्याचे तोंड काळे करून त्याला कोडे मारत गल्ल्यांत फिरवले. ग्रामीण पुनर्वसन व विकास मंत्रालयात नाेकरी लागली. तेथेही एक दिवस आत्मघाती हल्ला झाला. कसा तरी जीव वाचला. २०१७ मध्ये इंडियन कौन्सिल आॅफ कल्चरल रिलेशन्समध्ये शिष्यवृत्ती मिळवून दिल्लीत आले. स्वातंत्र्य काय असते हे येथे समजले. हरिवाला भारतात राहून पीएचडी करायची आहे. मात्र घरी आई-बहिणी वाट बघताहेत. (हरिवाचे नाव बदलले आहे.)

अफगाणी महिलांच्या हक्कांसाठी काम करणार

काबूलला परतून हरिवाला नोकरी करायची आहे. जनरेशन पॉझिटिव्ह एनजीओसोबत महिलांच्या हक्कासाठी काम करायचे आहे. ती सांगते, हिजाब, बुरखा, चादरीसारखा पेहराव कोणत्याही महिलेवर लादला जाऊ नये यासाठी माझे प्रयत्न असतील. सायंकाळी सहा वाजेच्या आधी त्यांनी कामावरून घरी परतायचेच आहे याची सक्ती करू नये.

बातम्या आणखी आहेत...