आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हिमाचल प्रदेशात लाॅकडाऊनचा सर्वात जास्त परिणाम विद्यार्थ्यांवर झाला. आधी अभ्यास पूर्ण बंद हाेता, त्यानंतर आॅनलाइन वर्ग सुरू झाले, तर बर्फवृष्टीमुळे लाहौल स्पितीच्या आदिवासी भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या समस्येमुळे ऑनलाइन शिकवणे कठीण झाले. या भागातील तीन शिक्षिकांनी मुलांचे भविष्य घडविण्यासाठी स्वत: त्रास साेसून त्यांचा अभ्यास सुरू ठेवला. कोरोनाच्या निर्बंधातही मुलांना शिकवणे कायम ठेवले. इतकेच नव्हे तर डिसेंबर २०२० मध्ये ऑफलाइन परीक्षेसाठी मुसळधार हिमवृष्टीतही प्रश्नपत्रिका मुलांच्या घरी पाठवली आणि त्यांची परीक्षाही घेतली. कामाबद्दलची त्यांची त्यागभावना बघून त्रिलाेकीनाथ स्नाे फेस्टिव्हलमध्ये स्थानिक मंत्री रामलाल मारकंडा यांच्या हस्ते शिक्षिका किरण लता यांचा सन्मान करण्यात आला. लाहौल स्पितीचे डीसी पंकज राय म्हणाले, चांगली सेवा दिल्याबद्दल शिक्षिकांचा प्रशासनाकडून सत्कार करण्यात येईल. त्यांनी छेरिंग डोलमा, किरण लता आणि अनिता देवी यांचेही काैतुक केले आहे.
अनिता देवी : घरी जाऊन वह्या तपासल्या
आॅनलाइन अभ्यासाबराेबरच घरी जाऊन मुलांना शिकवत राहिल्या. घरी जाऊन मुलांच्या वह्या तपासल्या. अभ्यास आणि शिकणे थांबू नये यासाठी पालकांशी सतत संपर्क साधला.
छेरिंग डोलमा : ७ मुलांना घरी शिकवले
घरातून बाहेर पडणे मुलांना कठीण हाेते. जेबीटी शिक्षिका छेरिंग डालमा यांनी ७ मुलांना आपल्या घरी बाेलावून शिकवले. त्यांच्या खाण्यापिण्याचीही घरी व्यवस्था केली.
किरण लता : घराेघरी जाऊन शिकवले...
बर्फवृष्टीत अनेक फूट जमलेला बर्फ आणि उणे तापमान असे असतानाही मुलांना शिकवण्यासाठी त्या पायी जायच्या. मुलांनी अभ्यास करावा म्हणून गृहपाठही तपासायच्या.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.