आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांना मारहाण:शिक्षिकेने पाचवीतील विद्यार्थिनीला पहिल्या मजल्यावरून ढकलले

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीतील शिक्षिका गीता देशवालने शुक्रवारी एका विद्यार्थिनीला शाळा इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून खाली ढकलले. मुलगी हिंदूराव रुग्णालयात उपचार घेत आहे. तिच्या डोक्याला मार लागला आहे. प्रत्यक्षदर्शीच्या जबाबाच्या आधारे शिक्षिकेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शाळेत शिकणारी मुलगी आपल्या जबाबात म्हणाली, या शिक्षिकेने यापूर्वीही विद्यार्थ्यांना मारहाण केली आहे. मात्र, तिच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. जखमी विद्यार्थिनी म्हणाली, ‘शिक्षिकने मला कात्रीने मारले व माझे केस ओढले. नंतर शाळेच्या पहिल्या मजल्यावरून खाली फेकले. मी काहीच चुकीचे केले नव्हते.’

बातम्या आणखी आहेत...