आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहात्मा गांधींची शिकवण आजही उपयुक्त आहे, असे अनेक जण म्हणतात. पण ती आयुष्यात अवलंबण्याचे काम सुरतच्या एका शिक्षकाने केले आहे. त्यांनी विद्यार्थ्यांत करुणा, दया, प्रेम आणि देशप्रेमाची जाणीव निर्माण करण्यासाठी गांधीवादाची मदत घेतली आहे. गेल्या १८ वर्षांपासून महेश पटेल यांनी सुमारे ७,००० विद्यार्थ्यांना गांधीवादी पद्धतीने करुणेचे धडे दिले आहेत. ते सुरतमध्ये १९९२ पासून शाळा चालवतात. ते स्वत: महात्मा गांधींच्या शिकवणुकीनुसार आयुष्य व्यतीत करतातच, पण २००३ मध्ये त्यांनी गांधीवादाचा अवलंब शाळांतही करण्याचे ठरवले. त्यांच्या मते, मुलांना जसे शिक्षण द्याल तसाच त्यांचा विकास होतो. त्यांना करुणा आणि दयेची शिकवण दिली तर ते पुढील आयुष्यात चांगला माणूस होऊ शकतील. एखादा विद्यार्थी वारंवार चूक करत असेल तर शिक्षक आपली शिकवण त्याच्यापर्यंत पोहोचवू शकला नाही असाच त्याचा स्पष्ट अर्थ आहे.
पटेल यांनी वर्ष २०१६ मध्ये सलग ५१ तास चरखा चालवला होता. विद्यार्थी स्वच्छता ठेवत नव्हते हे त्याचे कारण होते. ते स्वत: मुलांशी बोलले, पण कुठलाही मार्ग न निघाल्याने, ‘शिक्षा म्हणून मी ५१ तास चरखा चालवेन,’ असे त्यांनी सांगितले. मुलांनी दुसऱ्याच दविशी माफी मागितली आणि शिक्षकांच्या निर्देशाचे पालन करण्याचे वचन दिले. पण पटेल यांनी मुलांना म्हटले की, तुम्ही चूक केली तर त्याचा गुन्हेगार मी आहे. तुम्ही चूक मान्य केली, पण मी शिक्षा भोगेन.
पटेल सांगतात, मुलांना मारहाण करणे हा उपाय नाही. जोपर्यंत त्यांच्या मनात आदर नसेल तोपर्यंत त्यांच्या वागणुकीत बदल होणार नाही. मारहाण केल्यास त्यांच्या मनात राग निर्माण होईल. भीतीमुळे त्यांचा विकास कमी होईल. स्वत:ला काही गोष्टी समजू लागल्या की त्यांची प्रगती वेगाने होईल. आम्ही काही ठिकाणी कडुलिंबाच्या पानांचा रस काढण्याचे यंत्र बसवले आहे. शिक्षा देणे अनविार्य असेल तर आम्ही त्यांना कडुलिंबाचा रस पिण्याची शिक्षा देतो. हा रस शरीरासाठीही फायद्याचा आहे. पटेल हे बालपणापासूनच गांधीजींच्या मार्गावर चालत असून स्वत:ची सर्व कामे ते स्वत:च करत असत. ते आपल्या विद्यार्थ्यांनाही हीच शिकवण देत आहेत.
२०% मुलांचे आई-वडीलही याच शाळांत शिकले
महेश पटेल सुरतमध्ये तीन भाषांत पाच शाळा चालवतात. तेथे हिंदी, गुजराती आणि इंग्रजी माध्यमात शिक्षण दिले जाते. या पाच शाळांचे ते कॅम्पस डायरेक्टरही आहेत. त्यांच्या शाळांत येणाऱ्या सुमारे २० टक्के मुलांच्या आई-वडिलांनीही याच शाळांत शिक्षण घेतले आहे. पटेल यांनी सांगितले की, गांधीवादी शिक्षणाकडे लोकांचा कल वाढला आहे. गांधीवाद आणि अहिंसेची शिकवण समजावी आणि महात्मा गांधींच्या या शिकवणुकीचा आपल्या भावी आयुष्यात अवलंब करावा या हेतूने काही आई-वडील मर्यादित काळासाठी का होईना, मुलांना आमच्या शाळांत पाठवतात.
२६ जानेवारीला अनविार्य उपस्थितीचा नियम बदलला, मुलांना देशप्रेम शिकवण्यासाठी १५ दविस अनवाणी राहिले महेश पटेल यांनी सांगितले की, २६ जानेवारीला शाळेत न येणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा आदेश शाळा प्रशासनाने काढला. पण मी नियम बदलला. मुलांमध्ये देशप्रेमाची भावना नसेल तर ही शिक्षकांची चूक आहे. त्यानंतर त्यांनी १५ दविस अनवाणी राहण्याचा निर्णय घेतला. मुलांनाही त्याची जाणीव झाली. तेही अनवाणी शाळेत आले आणि शिक्षकांची माफी मागितली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.