आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The Terrorists Were On Their Way To Srinagar From Jammu With Ammunition In The Truck, The Security Forces Blew Up The Truck

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जम्मू-काश्मीरमध्ये 4 दहशतवादी ठार:ट्रकमध्ये दारूगोळा घेऊन जम्मूहून श्रीनगरकडे जात होते दहशतवादी, सुरक्षादलांनी ट्रकच उडवला

श्रीनगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तीन दिवसांपूर्वीच दिल्लीमध्ये जैशच्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती

जम्मूच्या नगरोटामध्ये सुरक्षा रक्षकांनी आज सकाळी जैशच्या 4 दहशतवाद्यांना कंठस्थान घातले. मिळालेल्या माहितीनुसार, चार दहशतवादी ट्रकमध्ये दारूगोळा घेऊन जम्मूहून श्रीनगरकडे जात होते. सुरक्षादलांना त्यांची माहिती मिळाली. नगरोटा येथील टोलनाक्यावर त्यांना अडवण्यात आले. सुरक्षारक्षकांनी त्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले. मात्र त्यांनी सुरक्षादलांवर ग्रेनेडचा हल्ला केला. यानंतर सुरक्षादलांनी ट्रकच उडवून दिला आणि दहशतवाद्यांना यमसदनी पाठवले. खबरदारीचा उपाय म्हणून जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद करण्यात आला आहे.

हे चारही दहशतवादी जैशचे होते. ट्रकमध्ये स्फोटकांबरोबरच धान्याची पोती होती
हे चारही दहशतवादी जैशचे होते. ट्रकमध्ये स्फोटकांबरोबरच धान्याची पोती होती

माहितीनुसार, गुरुवारी सकाळी 4.50 वाजता चकमकीला सुरुवात झाली. दोन तासांतच दहशतवाद्यांना ठार केले. जम्मू-श्रीनगर महामार्गावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

स्फोटात दहशतवाद्यांच्या एके 47 रायफल जळाल्या.
स्फोटात दहशतवाद्यांच्या एके 47 रायफल जळाल्या.

सांबा सेक्टरमधून भारतात आले होते दहशतवादी

जम्मू-काश्मीरचे DGP दिलबाग सिंह यांच्यानुसार, "जैशच्या चार दहशतवाद्यांनी बुधवारी रात्री सांबा येथील आंतरराष्ट्रीय सीमेवरून घुसखोरी केली होती. जम्मू-श्रीनगर महामार्गावरून एका ट्रकमधून जात होते, पोलिसांनी नगरोटा टोलनाक्यावर त्यांना अडवले. दहशतवाद्यांनी पोलिसांवर ग्रेनेड हल्ला केला, यात एक पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर यंदाची ही दुसरी चकमकी आहे. जानेवारीत सुरक्षा दलांनी 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. ते देखील याचप्रमाणे ट्रकमध्ये लपले होते."

कुणाला संशय होऊ नये यासाठी ट्रकवर जम्मू-काश्मीरचा क्रमांक होता
कुणाला संशय होऊ नये यासाठी ट्रकवर जम्मू-काश्मीरचा क्रमांक होता

आयजी विजयकुमार यांनी सांगितले की, दहशतवादी काश्मीर खोऱ्यातून जात असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यांना श्रीनगरला पोहचण्यापूर्वीच ठार केले. जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या नागरी निवडणुका अडथळा आणण्याचा दहशतवाद्यांचा कट होता.

तीन दिवसांपूर्वीच दिल्लीमध्ये जैशच्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती

सोमवारी रात्री दिल्लीतील पोलिसांच्या विशेष सेलने दोन दहशतवाद्यांना अटक केली होती. दोघांकडून काही महत्त्वाची कागदपत्रे आणि स्फोटके जप्त केली आहेत. अटक केलेले दोन्ही दहशतवादी जैश-ए-मोहम्मदशी संबंधित आहेत. दोघेही जम्मू काश्मीरमधील बारामुला आणि कुपवाडा येथील आहेत. त्यांची व्हॉट्सअप ग्रुपवर पाकिस्तानशी चर्चा करत होत होती.

बातम्या आणखी आहेत...