आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिसऱ्या आघाडीवर पूर्णविराम ?:तिसरी किंवा चौथी आघाडी भाजपला टक्कर देऊ शकत नाही, प्रशांत किशोर यांचे मोठे विधान

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिल्लीतील पवारांचे घर बनले राजकीय घडामोडींचे केंद्र

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) चे प्रमुख शरद पवार यांची 15 दिवसांत दोनवेळ भेट घेणारे निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी तिसऱ्या घाडीवर मोठे विधान केले आहे. NDTV शी बातचीतदरम्यान ते म्हणाले की, तिसरी किंवा चौथी आघाडी भाजपला टक्कर देऊ शकत नाही. तसेच, त्यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांना एकत्रित करण्याच्या दाव्याचेही खंडन केले आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, तिसऱ्या आघाडीची कुठलीच भूमिका नाही, असेही ते म्हणाले.

दिल्लीतील पवारांचे घर बनले राजकीय घडामोडींचे केंद्र
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी 15 पक्षांची बैठक बोलावण्यात आली अाहे. पवारांचे दिल्लीतील 6 जनपथ निवासस्थान हे सध्या राजकीय घडामोडींचे केंद्र बनले आहे. दुपारी 4 वाजता 15 राजकीय पक्षांची बैठक होणार आहे. तृणमूलचे रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी 11 जून रोजी मुंबईत पवारांची भेट घेतली होती. त्याच वेळी भाजपविरोधात विरोधकांची तिसरी आघाडी उभारण्याच्या चर्चेला सुरुवात झाली होती. त्यापाठोपाठ मंगळवारी प्रशांत किशोर यांनी पुन्हा पवारांची भेट घेतली. ही खासगी भेट होती, राजकीय चर्चा झाली नसल्याचा दावा किशोर यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...