आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Third Wave Crop In The Country Oscillated, New Patients Fell By 50% | Marathi News

दिलासादायक:देशात ओसरला तिसऱ्या लाटेचा पीक, नवे रुग्ण 50% पर्यंत घटले; केरळ वगळता सर्व प्रमुख राज्यांत दिलासादायक ट्रेंड

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात शहरानंतर आता ग्रामीण भागांतही नवीन रुग्ण घटू लागले आहेत

देशात २८ डिसेंबर २०२१ पासून सुरू झालेल्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा पीक ४ आठवड्यांतच आला. ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे सुरू झालेली ही लाट २० जानेवारीनंतर आेसरू लागली. नव्या रुग्णांत सलग १४ दिवसांपर्यंत घसरण झाल्याने पीक येऊन गेल्याचे तज्ज्ञ मानत आहेत. देशात २० जानेवारीला सर्वाधिक ३.४७ लाख नवे रुग्ण, तर २ फेब्रुवारीला १.७२ लाख रुग्ण आढळले. म्हणजे १४ दिवसांत नव्या रुग्णांची संख्या ५०% पर्यंत घटली आहे.

डब्ल्यूएचओसह जगातील बहुतांश संस्था कोरोनाच्या पीकचा अंदाज सक्रिय रुग्णसंख्येवर लावतात. ७ दिवसांपर्यंत सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ न झाल्यास तोच पीक असल्याचे मानले जाते. या हिशेबाने पाहिल्यास देशात १० दिवसांपासून सातत्याने सक्रिय रुग्णसंख्येत घट होत आहे. म्हणजे पीक येऊन ओसरला आहे. देशात सर्वात आधी मुंबई, दिल्ली, चेन्नई, बंगळुरू व कोलकात्यात पीक आला होता. आठवडाभरानंतर छोट्या शहरांत नव्या रुग्णांत घट सुुरू झाली. आता ग्रामीण भागांतही नवे रुग्ण घटत आहेत. सध्या फक्त केरळात सक्रिय रुग्णांत वाढ होत आहे.

बातम्या आणखी आहेत...