आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WHO आणि AIIMS च्या सर्व्हेमध्ये दावा:कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या लाटेचा लहान मुलांवर जास्त परिणाम होणार नाही

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डेल्टा व्हेरिएंटविरोधात बूस्टर शॉट आणणार स्पुतनिक वी

कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या लाटेचा लहान मुलांवर जास्त परिणाम होणार नाही. जागतिक आरोग्य संघटना(WHO) आणिर ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायंसेज (AIIMS) ने आपल्या सीरोप्रेवेलेंस सर्व्हेमध्ये हा दावा केला आहे. कोरोनाच्या धोकादायक व्हेरिएंटला पाहता भारतात तिसरी लाट येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, पण आता WHO आणि AIIMS च्या दाव्याने मोठा दिलासा दिला आहे.

सर्व्हेत सांगितल्यानुसार, वयस्करांच्या तुलनेत SARS-CoV-2 सिरोपॉजिटिव्हिटी रेट मुलांमध्ये जास्त आढळला आहे. सिरोपॉजिटिव्हिटी व्हायरसविरोधात नॅचुरल इम्युन रिस्पॉन्सला माउंट करण्याच्या शारीरिक क्षमतेला वाढवते. दिल्ली एम्समध्ये कम्युनिटी मेडिसिनचे प्रोफेसर पुनीत मिश्रांनी सांगितले की, दक्षिण दिल्लीच्या शरणार्थी कॉलोन्यांमध्ये सीरोप्रिवेलेंस 74.7% पेक्षा जास्त आढळला आहे.

हा आकडा आतापर्यंत झालेल्या कोणत्याही सीरो सर्व्हेपेक्षा जास्त आहे. सर्व्हेत सांगितल्यानुसार, दुसऱ्या लाटेच्या आधी दक्षिण दिल्लीत राहणाऱ्या 18 पेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये सीरोप्रिवेलेंस 73.9% होता. जास्त सीरोप्रिवेलेंस तिसऱ्या लाटेत मुलांसाठी एखाद्या कवचप्रमाणे काम करेल.

पाच राज्यातून 10 हजार सँपल घेतले

या सर्व्हेसाठी 5 राज्यातून 10 हजार सँपल घेतले होते. सध्या जी रिपोर्ट आली आहे, त्यात 4 राज्यांच्या 4500 सँपलचा आधार घेण्यात आला आहे. येत्या दोन-तीन महिन्यात पाच राज्यातील 10 हजार सँपल साइजची पूर्ण रिपोर्ट येईल. हा अभ्यास दिल्ली शहर, दिल्ली ग्रामीण, भुवनेश्वर, गोरखपूर आणि अगरतलात सरासरी वय 11 ते 14 वर्षांच्या मुलांवर केला. अभ्यासासाठी 15 मार्च 2021 आणि 10 जून 2021 दरम्यानचा डेटा घेण्यात आला. संशोधकांनी सांगितल्यानुसार, SARS-CoV-2 विरोधात सीरम अँटीबॉडीचे परीक्षण करण्यासाठी एलिसा किटचा वापर केला होता. या किटमधून मानवी शरीरात कोरोना व्हायरसच्या अँटीबॉडीचा शोध घेतला जातो.

डेल्टा व्हेरिएंटविरोधात बूस्टर शॉट आणणार स्पुतनिक वी
तिकडे, रशियाची व्हॅक्सीन स्पुतनिक वी लवकरच एक बूस्टर शॉट आणण्याच्या तयारीत आहे. हा बूस्टर डोज कोरोना व्हायरसच्या भारतातील डेल्टा व्हेरिएंटवर मोठा परिणाम करेल.