आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Amravati Narmadapurm Latest Update | The Three From Amravati, Who Were Leaving With Cattle, Were Beaten Up By The Mob; Death Of One | Marathi News

चार जणांना अटक:गोवंश घेऊन निघालेल्या अमरावतीच्या तिघांना जमावाने झोडपले; एकाचा मृत्यू, 30 गायींना बांधून कोंबले

नर्मदापुरम10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्य प्रदेशातील नर्मदापुरम जिल्ह्यातील सिवनी मालवा येथे मंगळवारी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास मॉब लिंचिंगच्या घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला, तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. तिघेही महाराष्ट्रातील अमरावतीचे रहिवासी आहेत. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.

हे तिघे एका ट्रकमध्ये (एमएच ०४ सीडी ८७५१२) गोवंश नंदरवाडाहून सिवनी मालवाकडे निघाले होते. हे कळताच सिवनी मालवा गावापासून सुमारे दोन किलोमीटर दूर बराखडनजीक गावकऱ्यांनी ट्रॅक्टर ट्रॉली आणि स्टॉपर लावून ट्रकला अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु चालक शेखलाल यांनी स्टॉपरला धडक देऊन ट्रक वेगाने पुढे दामटण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्रक थेट ट्रॅक्टरला धडकून उलटला. त्याच वेळी जमावाने शेखलाल, मुश्ताक आणि नजीर अहमद या तिघांना बेदम मारहाण केली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात हलवले, परंतु उपचारावेळी नजीरचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी १५ ते २० अज्ञात लोकांविरोधात मारहाण, हत्येसह इतर भादंवि कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

३० गायींना बांधून कोंबले
या गोवंशला नंदरवाडा येथून अमरावतीच्या जनावरांच्या बाजारात घेऊन चाललो होतो. तिथून त्यांची रवानगी कत्तलखान्यात केली जाणार होती, असे चालकाने सांगितले. दर आठवड्याला गोवंशची तस्करी सुरू आहे. ज्या ट्रकला रोखले त्यात ३० गायींचे पाय बांधून अक्षरश: कोंबले होते, असे गावकऱ्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...