आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोनामुळे लग्नाचे रीतिरिवाज बदलले आहेत. लग्न लावून देणारे पंडितही त्याचे कडक पालन करत आहेत.आधी सप्तपदी झाल्यानंतर थेट पंडिताच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतले जात, परंतु आता ही परंपरा बंद केली आहे. आता पंडित दुरूनच वधू-वर व त्यांच्या कुटुंबीयांना आशीर्वाद देत आहेत. काेराेनाने लग्नाचे रिवाजच नाही तर भागवत कथेसारख्या अनेक परंपरा संपवल्या आहेत. आधीसारखे गादीवर विराजमान महाराजांचे पाय आता धुतले जात नाहीत.
भागवत कथेसारखी परंपरादेखील बंद केली आहे. कथा संपल्यानंतर यजमान कथा वाचणाऱ्याचे पाय धुतले जात. काेराेना काळात स्वत:ला आणि समाजाला सुरक्षित ठेवण्यासाठी पंडितांनी शिष्टाचार तयार केला आहे.
कोरोनाकाळात आता या रिवाजांवर आहे बंदी, जाणून घ्या
आता टिळा नाही : छत्तीसगडमधील लग्नात सगळीकडे हा रिवाज आहे. लग्नाला येणारे पाहुणे वर आणि वधूला तांदळाचा टिळा लावतात. पण आता पंडितांनी ताे बंद केला असून दुरूनच नमस्कार करण्यासाठी प्राेत्साहन दिले जात आहे.
साखरपुड्यात चरणस्पर्श नाही : साखरपुड्यासाठीही पंडितांनी अनेक नियम तयार केले आहेत. छत्तीसगडमध्ये साखरपुड्यात वर-वधू कुटुंबीयांच्या पाया पडून आशीर्वाद घेतात. तेही आता बंद केले आहे.
व्याहीभेटही बंद : वर-वधूचे आई-वडील एकमेकांची गळाभेट घेतात. त्याआधी दाेन्ही हार घालतात. यामुळे थेट संपर्कात येण्याच्या कारणामुळे पंडितांनी व्याहीभेट बंद केली आहे. दुरूनच एकमेकांना नमस्कार करण्यासाठी सांगितले जात आहे.
साेहळ्यातील आशीर्वाद : लग्न समारंभात पंडितांच्या पाया पडून आशीर्वाद घेण्याची परंपरा असते. परंतु आता दुरूनच नमस्कार घेऊन आशीर्वाद घेतला जात आहे. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर सर्व पंडित या सगळ्या गाेष्टींचे काटेकाेर पालन करत आहेत.
( धर्म-संघ पीठ परिषदचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आचार्य झम्मन शास्त्री आणि विश्व हिंदू परिषद के धर्माचार्य प्रमुख छत्तीसगढ़ कान्हा महाराज व मोनू महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे)
नियम कडक पाळले तरच काेराेनाचा अटकाव शक्य
कोरोनाची स्थिती बघून लग्न साेहळ्यात पंडित नियमांचे कडक पालन करत आहेत. प्राचीन काळच्या परंपरा पुन्हा येत आहेत. शुद्ध-पावित्र्य याला आमची प्राथमिकता आहे. त्यामुळे काेराेना नियंत्रणात येईल. सर्व पंडितांनी स्वत:च्या आणि समाजाच्या सुरक्षिततेचा विचार करून कार्यक्रमांचे आयाेजन करावे - आचार्य झम्मन शास्त्री, राष्ट्रीय उपाध्यक्ष, धर्म-संघ पीठ परिषद
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.