आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

392 विशेष रेल्वे:एक्स्प्रेसच्या तुलनेत 10-30% जास्त भाडे, 20 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबरदरम्यान धावणार या रेल्वे

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रेल्वेची प्रवाशांना माेठी भेट

दुर्गापूजा, दसरा, दिवाळी आणि छठपूजेसारख्या सणासुदीच्या हंगामात ३९२ अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेऊन रेल्वेने प्रवाशांना माेठी भेट दिली आहे. परंतु या गाड्या २० आॅक्टाेबर ते ३० नाेव्हेंबर या मर्यादित कालावधीतच धावणार आहेत.

रेल्वे मंत्रालयाने विविध भागातील मागणी लक्षात घेऊन १९६ जाेडी गाड्या चालवण्यास मान्यता दिलेली असून त्या लखनऊ, काेलकाता, वाराणसीसारख्या ठिकाणाहून सुटतील. यात दरराेज, आठवड्यातून चार वेळा, आठवड्यातून एकदा चालणाऱ्या गाड्यांचा समावेश असेल.

विशेष गाड्यांची घाेषणा करताना रेल्वेने या सर्व गाड्या अतिजलद गाड्या असतील व त्यांचा वेग कमीत कमी ५५ किलाेमीटर प्रतितास असेल. या गाड्यांचे भाडे मेल व एक्स्प्रेस गाड्यांच्या तुलनेत १० ते ३० % जास्त असेल. थाेडक्यात, ते इतर विशेष गाड्यांप्रमाणे असेल, असे रेल्वेने स्पष्ट केले आहे. वातानुकूलित तृतीय श्रेणीच्या डब्यांची संख्या जास्त वाढवून या गाड्या चालवाव्यात, असे आदेश रेल्वेने विभागीय रेल्वेला दिले आहेत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser