आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कठोरता:न्यायालयावर टीका करण्याचा ट्रेंड वाढलाय, सुप्रीम कोर्टाने सुनावले खडे बोल

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अवमाननाप्रकरणी कार्टूनिस्टविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका
  • टीका करणे अवमान नाही : रचिता तनेजा

न्यायालयावर टीका करण्याचा ट्रेंड वाढत चालला असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने म्हटले की, सध्या निर्णयावर सर्वच जण टीका करत आहेत. यामुळे प्रकरण लांबते. कार्टूनिस्ट रचिता तनेजा यांच्याविरोधात अवमाननाप्रकरणी दाखल याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हे खडे बोल सुनावले. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील पीठ याप्रकरणी सुनावणी करत आहे.

न्यायालयाने तनेजा यांना तीन आठवड्यांच्या आत म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयासमोर शुक्रवारी तनेजा यांच्या वतीने वरीष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली. ते म्हणाले, आम्हाला नोटीस का बजावली जात आहे हे कळालेले नाही. न्यायालयावर टीका करणे म्हणजे अपमान नसतो. सर्वोच्च न्यायालयाने सुटीच्या काळातही एका पत्रकाराच्या प्रकरणावर सुनावणी का केली, यावर तनेजाने आपले विचार मांडले होते. यादरम्यान न्यायाधीश एम.आर.शहा यांनी तनेजाच्या वकिलांना थाबंवले. ते म्हणाले, तुम्हाला उत्तर दाखल करायचे असेल तरच या प्रकारचा युक्तिवाद करा. यानंतर कॉमेडियन कुणाल कामरा प्रकरणाची सुनावणी आमच्या प्रकरणात होऊ नये अशी मागणी रोहतगींनी केली. म्हणणे मांडण्यास मुदत द्यावी, असेही ते म्हणाले. यावर तनेजाला तीन आठवड्यांची मुदत देऊन न्यायालयाने सुनावणी स्थगित केली.

तनेजा विरोधातील प्रकरण :

विधी शाखेचा विद्यार्थी आदित्य कश्यपने तनेजाविरोधात याचिका दाखल केली होती. कश्पयनुसार, तनेजाने वादग्रस्त ट्वीट करून सर्वोच्च न्यायालयाने सत्ताधारी भाजपशी हात मिळवल्याचे म्हटले होते. तनेजाने तीन ट्वीट न्यायालयाला उद्देशून केले. सर्वोच्च न्यायालयाला बदनाम करणे आणि प्रतिमा मलिन करणे यामागील हेतू होते. यामुळे तनेजाविरोधात अवमाननेची कारवाई केली जावी. न्यायालयाने या याचिकेवर तनेजाला नोटीस बजावली होती.

कॉमेडियन कुणाल कामराचे शपथपत्र, हवे तर सरकारने इंटरनेटवर बंदी घालावी

दुसरीकडे, सर्वोच्च न्यायालयाबाबत वादग्रस्त ट्वीट केल्याप्रकरणी न्यायालयाच्या अवमाननेच्या कारवाईचा सामना कॉमेडियन कुणाल कामरालाही करावा लागत आहे. कामराने शुक्रवारी याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी शपथपत्र दाखल केले. कामराने यात म्हटले की, मर्यादा ओलांडल्याचे सरकारला वाटत असल्यास त्यांनी इंटरनेटवर अनिश्चित कालावधीसाठी बंदी घालावी. न्यायालयाने असे केल्यास मीदेखील माझ्या काश्मिरी मित्रांप्रमाणे दरवर्षी १५ ऑगस्टच्या शुभेच्छांचे पत्र लिहीन. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली पीठाने याप्रकरणी याचिकाकर्त्यांनी आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...