आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
गुजरातच्या सुरतमध्ये मोठा अपघात घडला आहे. कोसांबामध्ये एका डंपरने 20 जणांना चिरडले. यामध्ये 15 जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, सर्व मजूर होते आणि राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यातील कुशलगड येथील रहिवासी होते.
या अपघातात एकूण 15 जणांचा मृत्यू झाला असून यात 14 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एका लहान मुलीचाही रुग्णालयात उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. तर इतर गंभीर जखमी आहेत. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. डम्पर चालक दारूचा नशेत असल्याची पोलिसांना शंका व्यक्त केली आहे. यासंदर्भात मेडीकल अहवाल आल्यावर कळले. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.संपुर्ण रस्त्यावर रक्ताचा छडा पडलेला आहे. या अपघातात मातापित्या मृत्यू झाला आहे तर त्यांची सहा महिन्याची चिमुकली वाचली आहे.
मृतांमधील राकेश रूपचंद घटनास्थळापासून जवळच असलेल्या एका दुकानात काम करत होता. तो दररोज दुकानाजवळील एका केबिनमध्ये झोपायचा. मात्र सोमवारी केबिनऐवजी तो मजुरांसोबत फुटपाथवर झोपला आणि त्याच्यावर काळाने घाला घातला. डंपरच्या धडकेत 4-5 दुकानांचे शेड देखील तुटले आहेत.
ऊसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर व डम्परचा अपघात झाला. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अतिशय वेगात डम्परने ट्रॅक्टर धडक दिल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. रस्त्याच्या कडेला जाऊन तो डम्पर झोपलेल्या मजूरांच्या अंगावर गेला. या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेले लोक मजूरीची काम करत असून सर्वच जण राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यातील कुशलगडचे रहिवाशी असल्याची माहिती गुजरात पोलिसांनी दिली.
ट्रॅक्टरला धडकल्यानंतर ट्रक अनियंत्रित झाला
पोलिसांनी सांगितले की, डंपरची ऊसाच्या ट्रॅक्टरसोबत धडक झाली. यामध्ये डंपर चालकाचा ताबा सुटल्यामुळे डंबर फूटपाथवर आला, आणि फूटपाथवर झोपलेली 18 लोक चिरडली गेली.
मोदींनी व्यक्त केला शोक, मदतीची केली घोषणा
“सुरतमध्ये ट्रकच्या अपघातामुळे जीवितहानी झाल्याची घटना दुःखदायक आहे. माझे विचार शोकग्रस्त कुटुंबांसमवेत आहेत. सूरत येथे झालेल्या अपघातामुळे बळी पडलेल्यांपैकी प्रत्येकाला पुढील पीएमएनआरएफकडून 2 लाख रु. (पीएमएनआरएफ कडून) देण्यात येईल आणि जखमींना 50,000 रु. देण्यात येतील", असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
Ex-gratia of Rs. 2 lakh each from PMNRF would be given to the next of kin of those who have lost their lives due to the accident in Surat. Rs. 50,000 each would be given to those injured.
— PMO India (@PMOIndia) January 19, 2021
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.