आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात रोजगाराचे आव्हान वाढले:बेरोजगारीचा दर वाढून 8.28% वर, नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांपैकी 0.3% जणांनाच संधी

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अर्थव्यवस्थेला वेग आलेला असतानाच रोजगारात वाढ होण्याऐवजी घट झाली आहे. ऑगस्टमध्ये बेरोजगारी दर ८.२८% होता, तो गेल्या एक वर्षातील सर्वाधिक आहे.

सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या (सीएमआयई) डेटानुसार, ऑगस्टमध्ये शहरी बेरोजगारी दर ८.२% वरून वाढून ९.५७% झाला, तर ग्रामीण भागांत ६.१४% वरून वाढून ७.६८% झाला आहे. सीएमआयईचे मॅनेजिंग डायरेक्टर महेश व्यास यांनी सांगितले की, ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा ४० लाख जास्त लोकांनी रोजगार मिळवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश मिळाले नाही.

दुसरीकडे कृषी क्षेत्रात रोजगारात घट झाली आहे. पावसाला विलंब हे त्याचे कारण आहे. कारण पाऊस लवकर सुरू न झाल्याने तांदळाची लागवड कमी झाली आहे.

सर्वाधिक बेरोजगारी दर
हरियाणा 37.3%
जम्मू-काश्मीर 32.8%
राजस्थान 31.4%
झारखंड 17.3%

सर्वात कमी बेरोजगारी दर
छत्तीसगड 0.4%
मेघालय 2.0%
महाराष्ट्र 2.2%
गुजरात 2.6%

आश्वासन हवेत
केंद्र सरकार २०२४ पर्यंत १० लाख सरकारी नोकऱ्या देऊ, असे म्हणत आहे, पण आकडवारीनुसार, राज्य सरकारांनी गेल्या ८ वर्षांत नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या युवकांपैकी ०.३% नाच नोकरी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...