आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The US Will Close The Lottery System For H 1B Visas, Selected Through A Pay as you go System

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतीयांना धक्का:अमेरिका एच-1बी व्हिसाची लाॅटरी पद्धत बंद करणार, वेतनआधारित यंत्रणेद्वारे निवड

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या परदेशी व्यावसायिकांना एच-बी१ व्हिसा देण्याची संगणकीकृत लॉटरी पद्धत रद्द करून त्याऐवजी वेतनआधारित निवड पद्धती स्वीकारण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. याबाबतची अधिसूचना फेडरल रजिस्टरमध्ये प्रकाशित करण्यात येणार आहे. या अधिसूचनेवर संबंधित ३० दिवसांच्या आत उत्तर देऊ शकतील, असे गृह संरक्षण विभागाने (डीएचएस) बुधवारी सांगितले. यामुळे अमेरिकेत जाण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या भारतीय आयटी व्यावसायिकांची अडचण होणार आहे.

डीएचएसनुसार लॉटरी पद्धत रद्द केल्याने दरवर्षी कमी वेतन असलेल्या एच-बी१ व्हिसाधारकांच्या येण्याने अमेरिकी कर्मचाऱ्यांवर भत्त्यांसाठी पडणारा दबाव कमी होईल. दरवर्षी अमेरिका लॉटरी पद्धतीने ८५ हजार एच-बी१ व्हिसा देत असते. यात भारतीय आयटी व्यावसायिकांची संख्या मोठी असते.

तरतूद : प्रस्तावाच्या अंतर्गत एच-बी१ व्हिसाधारकांना किमान १.१ लाख डॉलर वेतन द्यावे लागेल
डीएचएस सचिव केन कुसिनेली यांनी सांगितले की, प्रस्तावाची अंमलबजावणी झाल्यानंतर अमेरिकी कामगारांच्या अधिकारांचे संरक्षण करण्याचे आश्वासन ट्रम्प प्रशासनाला पूर्ण करता येईल. लॉटरीच्या एच-बी१ व्हिसामुळे जे देशातील (अमेरिकी) व्यावसायिकांऐवजी बाहेरून कमी वेतन घेणाऱ्या कामगारांना ठेवतात, त्यांना कठीण होईल.

- नव्या प्रस्तावात एच-बी१ व्हिसावर नोकरी देणाऱ्यांना विदेशी कर्मचाऱ्यांना किमान १ लाख १० हजार डॉलर (८० लाख रुपये) द्यावे लागतील. - एच-बी१ अंतर्गत कामगार ठेवू इच्छिणाऱ्या कंपन्या कमीत कमी दोन वर्षे अमेरिकी कामगारांना विनाकारण काढू शकणार नाहीत.