आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चालताना कोसळला अन् देवाघरी गेला:घराच्या अंगनात व्यक्ती लडखडत पडला, हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा दावा

गोपाळगंजएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बिहारच्या गोपाळगंजमधील एका व्यक्तीचा उभ्याउभ्याच मृत्यू झाला. हा 50 वर्षीय व्यक्ती हातात काही सामान घेऊन जात होता. त्याने दुसऱ्या एका व्यक्तीच्या हातात हे सामान दिले. त्यानंतर तो काही क्षण चालला तोच तो खाली कोसळला. त्यानंतर क्षणार्धातच त्याचा मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ उजेडात आला आहे. तो पाहून अनेकांनी आपल्या तोंडात बोटे घातली आहेत. एखाद्या सदृढ व्यक्तीचा मृत्यू असा कसा होऊ शकतो? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

नगर ठाणे हद्दीतील जंगलिया मोहल्ल्यात गत 3 तारखेला ही घटना घडली. मोहम्मद अलाउद्दीन असे मृत व्यक्तीचे नाव आहे. अलाउद्दीन जमिनीवर कोसळताच तिथे उपस्थित लोक गोळा झाले. त्यांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. पण ते उठले नाही.

मोहम्मद अलाउद्दीन सदृढ व्यक्ती होते. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
मोहम्मद अलाउद्दीन सदृढ व्यक्ती होते. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

20 वर्षांपासून दुबईत राहत होते अलाउद्दीन

मोहम्मद अलाउद्दीन मागील 20 वर्षांपासून दुबईत वास्तव्यास होते. 25 ऑक्टोबर रोजी आपल्या मुलाच्या लग्नासाठी ते गोपाळगंजला आले होते. येथे त्यांनी धुमधडाक्यात 28 ऑक्टोबरला आपल्या मुलाचे लग्न केले. घरात सर्वकाही ठीक होते. त्यांना बीपीचाही आजार नव्हता. त्यानंतरही त्यांचा असा मृत्यू झाल्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

हृदयविकाराच्या धक्क्याची भीती

कुटुंबीयांनी सांगितले की, लग्न झाल्यानंतर 3 नोव्हेंबर रोजी सायंकाळी ते काही कामासाठी घराबाहेर गेले होते. एक पाकीट आपल्या नातेवाईकाला दिल्यानंतर ते घरी येत होते. तेव्हा ते घरापुढेच कोसळले व त्यांचा मृत्यू झाला. ही घटना हृदयविकाराच्या धक्क्यामुळे झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

घटनेनंतर गोळा झालेला जमाव.
घटनेनंतर गोळा झालेला जमाव.

ही संपूर्ण घटना घराजवळ लावलेल्या एका CCTVमध्ये कैद झाली आहे. डॉक्टरांनी फुटेज पाहून ही घटना हृदयविकाराच्या झटक्यामुळे घडल्याचा दावा केला जात आहे. सद्यस्थितीत अलाउद्दीन यांच्या कुटुंबीयांशी या प्रकरणी चौकशी केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...