आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मेघालयची राजधानी शिलाँगपासून ६५ किमी अंतरावरील ईस्ट खासी हिलच्या पहाडांत मासिनराम हे छोटेसे गाव आहे. तेथे पावसाचे वार्षिक प्रमाण आहे ११,८७२ मिमी. हा जगात एखाद्या ठिकाणी होणारा सर्वाधिक पाऊस आहेे. नैसर्गिक संसाधनांसह आयुष्य कसे व्यतीत करावे याचे आदर्श उदाहरण म्हणजे मासिनरामचे लोक. सरपंच लसबोर्न शांगलिंग यांनी सांगितले की, जवळपास प्रत्येक मोसमात हा भाग ढगांंनी व्यापलेला असतो. मे ते ऑक्टोबरदरम्यान असे अनेकदा घडते की, सलग ९ दिवस आणि ९ रात्री पाऊस पडतो. अनेक महिने सूर्याचे दर्शनही होत नाही. शाळेचे शिक्षक एन. आर. रापसांग म्हणाले की, मे ते ऑक्टोबरदरम्यान आम्हाला शाळा बंद ठेवावी लागते. विद्यार्थी आले तरी ते पूर्ण भिजलेले असतात. असे असले तरीही आम्ही अभ्यासक्रम वेळेतच पूूर्ण करतो.
येथील सर्वात मोठे आव्हान म्हणजे घरात येणारा पाऊस आणि त्यामुळे होणारी ओल रोखणे. त्यासाठी खिडक्या, दारे आणि सर्व झरोके पूर्णपणे बंद करावे लागतात. थोडेसे दुुर्लक्ष झाले तरी घरातील सर्व सामान भिजते. दिवसात तीन-चार वेळा हीटरच्या मदतीने कपडे वाळवावे लागतात. गावाचे सचिव दोहलिंग यांनी सांगितले की, काही वर्षांपूर्वीपर्यंत लोक मुसळधार पावसाच्या आवाजापासून बचाव करण्यासाठी छतांवर गवताचा मोठा थर घालत असत. पण आता त्याची जागा नव्या तंत्रज्ञानाने घेतली आहे. आता तेथे घरांचे छत साउंडप्रूफ केले जात आहे. सरपंच लसबोर्न म्हणाले की, येथे १००० कुटुंबे आहेत, त्यापैकी बहुतांश खासी आदिवासी आहेत. कोरोनामुळे लॉकडाऊन लागल्यावर लोकांना घरात राहण्यात कुठलीही अडचण जाणवली नाही. मे ते ऑक्टोबरपर्यंत वाडवडिलांपासून लॉकडाऊनचा रिवाज आहे. या काळात गरज असेल तरच लोक घरांतूून बाहेर पडतात. घरांत राहूनच कॅरम, पत्ते हे खेळ खेळूून मनोरंजन करून घेतात. घरातील ज्येष्ठ परंपरा आणि वाडवडिलांचे किस्से-कथा सांगतात. अनेक आव्हाने असली तरी हा काळ खूप सुखद आठवणी देऊन जातो.
बांबूची त्रिकोणी टोपी पोशाखाचाच भाग
गावाची विशेष ओळख म्हणजे पावसापासून बचावासाठी बांबूची विशेष टोपी. स्थानिक भाषेत तिला ‘क्नूप’ म्हणतात. मुुसळधार पावसातही लोक तिच्या मदतीने सर्व कामे आरामात करतात.
जगातील सर्वात लांब गुहाही येथेच आढळली
२०१६ मध्ये गावात बलुआ ही जगातील सर्वात मोठी गुहा आढळली. तिला क्रेमपुरी म्हणतात. ती २४,५८३ फूट लांब आहे. दुसऱ्या क्रमांकावर व्हेनेझुएलातील गुहा आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.