आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The Villagers Took Advantage Of The Lockdown, 10,000 Families Planted Vegetables; Now Also Sold In The Market

स्वावलंबी:लॉकडाऊनच्या संधीचे ग्रामस्थांनी सोने केले, १० हजार कुटुंबांनी भाज्या लावल्या; आता बाजारात विक्रीही

कोची (के. पी. सेतुनाथ)2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
येथे शेतीव्यतिरिक्त लोक घराचे छत, व्हरंड्यातही भाज्या लावत आहेत.
  • केरळच्या वडक्ककेरा पंचायत क्षेत्रातील प्रत्येक घरात घडली नवी कृषी क्रांती
  • मोहिमेला नाव दिले - द व्हिजिटेबल फार्मिंग चॅलेंज, अव्वल शेतकऱ्यास बक्षीस

लॉकडाऊनमध्ये केरळमधील एका ग्रामपंचायतीने चक्क नवी कृषी क्रांती केली. २४ मार्चला जेव्हा २१ दिवसांचे लॉकडाऊन घोषित झाले तेव्हा अर्नाकुलम जिल्ह्यातील वडक्ककेरा पंचायतीने ठरवले की गावात कुणीच बिनकामी बसणार नाही. गावातील मोकळ्या जागा, घरांजवळ तसेच छतांवरही भाज्या लावायचे ठरले. यात खते वापरायची नाहीत, असेही ठरले. या मोहिमेला द व्हिजिटेबल फार्मिंग चॅलेंज असे नाव देण्यात आले. काही दिवसांतच पंचायत क्षेत्रातील १०,३१२ कुटुंबांपैकी ९,४१७ कुटुंबांनी यात सहभाग घेतला. ७० दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये हे लोक भाज्यांबाबत स्वावलंबी झाले आहेत. सामूहिक प्रयत्नांतून भाज्यांचे हे उत्पादन इतके झाले की केरळ सरकारच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी मदत सुरू केली. येथे लोक अगोदर छोटे गट करून फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत आपापल्या घरांजवळील मोकळ्या जागा स्वच्छ करू लागले. नंतर जमिनीची मशागत केली. ग्रामपंचायतीने वेगवेगळ्या प्रकारच्या बियांची २० हजार पाकिटे मोफत दिली. आज येथे प्रत्येक घरात भेंडी, वांगी, भोपळे, टोमॅटो इत्यादी भाज्या डोलू लागल्या आहेत.  पंचायतीचे सहायक कृषी अधिकारी एस. सीना यांनी सांगितले की, लोकांना प्राेत्साहन देऊन आम्ही हा कार्यक्रम सुरू केला होता. लॉकडाऊनदरम्यान घरबसल्या लोकांनी भाज्या लावाव्यात हा उद्देश होता. हा प्रयोग खूपच यशस्वी ठरला. बहुतांश लोक आता कुटुंबासह शेतीचा आनंद घेत आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही पुरस्कारही देणार आहोत.

0