आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने रविवारी घरच्या मैदानावर पाच वेळचा विजेता मुंबई इंडियन्सचा ८ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करत मुंबईने ७ गडी गमावून १७१ धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्सने १६.२ षटकांत केवळ २ गडी गमावत लक्ष्य गाठले. विराटने (८२*) आयपीएलमधील ५०वे अर्धशतक केले. कर्णधार डु प्लेसिसने ४३ चेंडूंत ७३ धावा केल्या. तो प्लेअर ऑफ द मॅच ठरला. आरसीबीचा हा पहिला विजय आहे.
{याआधी राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादचा ७२ धावांनी पराभव करत शानदार सुरुवात केली. राजस्थानने ५ गडी गमावत २०३ धावा केल्या. उत्तरात हैदराबाद ८ गडी गमावत १३१ धावाच करू शकला. २२ चेंडूंत ५४ धावा करणारा बटलर प्लेअर ऑफ द मॅच ठरला. राजस्थानने पाॅवरप्लेच्या सुरुवातीच्या ६ षटकांत ८५ धावा केल्या. ही राजस्थानची आयपीएल इतिहासातील पाॅवरप्लेमधील सर्वात मोठी धावसंख्या आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.