आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Wealth Of Tirupati Temple Is More Than The Budget Of 26 States! The Total Wealth Of The Temple Is Rs 2.5 Lakh Crore

तिरुपती देवस्थानची संपत्ती 26 राज्यांच्या बजेटहून जास्त!:देवस्थानाची एकूण संपत्ती 2.5 लाख काेटी रुपयांवर

तिरुपतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील सर्वात श्रीमंत असा लाैकिक असलेले तिरुमलातील तिरुपती देवस्थानमची (टीटीडी) एकूण संपत्ती सुमारे २.५ लाख काेटी रुपये एवढी आहे. देशातील २६ राज्यांच्या बजेटपेक्षाही देवस्थानाची संपत्ती जास्त आहे. देवस्थान समितीने दिलेल्या माहितीनुसार मंदिराच्या संपत्तीमध्ये बँकांतील मुदतठेवींचादेखील महत्त्वाचा वाटा आहे. कारण या ठेवींच्या व्याजातून मंदिराच्या उत्पन्न आणि पर्यायाने संपत्तीत वाढ झाली आहे. तिरुपतीची देशभरातील सरासरी एकूण संपत्ती २.५ लाख काेटींवर आहेत. त्यात जमीन, इमारती, राेख तसेच साेने ठेव इत्यादीचा समावेश हाेताे. यात अनमाेल दागिने, काॅटेज, विश्रामगृह इत्यादींचा मात्र या एकूण संपत्तीत समावेश करण्यात आलेला नाही. सार्वजनिक बँका, खासगी बँकांत ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत १५ हजार ९३८ काेटींहून जास्त संपत्ती आहे. जून २०१९ मध्ये हा आकडा १३ हजार २५ काेटी रुपये हाेता. देवस्थानची बँकांतील साेन्याची ठेव कमालीची वाढली आहे. २०१९ मध्ये तिरुपतीचे बँकांत ७.३ टन साेने हाेते. आता ही साेने ठेव १०.२५ टनावर गेली आहे. ३० सप्टेंबर २०२२ ची ही नाेंद आहे. टीटीडीला एसबीआय आणि आेव्हरसिज बँकेतील सुमारे १०.२५ टन एवढ्या साेन्याच्या ठेवीतून चांगले उत्पन्न झाले आहे. एसबीआयमध्ये ९.८ टन साेन्याची ठेव आहे. आंध्र प्रदेश, तमिळनाडू, तेलंगणा, आेडिशा, हरियाणा, महाराष्ट्र, नवी दिल्ली येथे तिरुपती संस्थानच्या मालकीची सुमारे ७ हजारांहून जास्त एकर जमीन आहे.

व्याजापाेटी ६६८ काेटी रुपये
तिरुपती संस्थानने मांडलेल्या २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात बँकांतून ६६८ काेटी रुपयांचे उत्पन्न बँकांतील राेख ठेवींवरील व्याजातून मिळेल, असे प्रस्तावित केले आहे. त्याशिवाय १ हजार काेटी रुपये राेखीने मिळतील. हुंडीतून ही रक्कम मिळेल. २.५ काेटी भाविकांच्या दानातून ही रक्कम जमा झाली आहे.

तिरुपती - २.५ लाख काेटी
महाराष्ट्र - ५,४८,७८०
राजस्थान - ३,५०,७४७
तामिळनाडू- ३,२९,०३५
उत्तर प्रदेश- ६,१५,५१९
प. बंगाल- ३,०८, ७२७
(सर्व आकडे काेटी रुपयांत)

बातम्या आणखी आहेत...