आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The WHO Report Claims That Corona Infections Have Increased In India Due To Various Religious And Political Events

निवडणूक आणि कुंभ बनले कोरोना स्प्रेडर?:WHOच्या रिपोर्टमध्ये दावा- भारतात अनेक धार्मिक आणि राजकीय आयोजनांमुळे कोरोना संक्रमण वाढले

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • WHOच्या रिपोर्टमध्ये दावा- भारतात अनेक धार्मिक आणि राजकीय आयोजनांमुळे कोरोना संक्रमण वाढले

देशात मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या कोरोनामागे मागच्या महिन्यात झालेल्या निवडणुका आणि कुंभ मेळा आहे. हे जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) रिपोर्टमधून सिद्ध झाले आहे. कोरोनाबाबत WHO कडून बुधवारी जारी अपडेटमध्ये सांगण्यात आले की, भारतात कोरोना पसरण्यामागे अनेक कारणे आहेत.

दरम्यान, WHO ने ठराविक एखाद्या धार्मिक किंवा राजकीय आयोजनाचे नाव घेतले नाही. पण, म्हटले की, अनेक धार्मिक आणि राजकीय आयोजनांमध्ये जमा झालेली गर्दी संक्रमण वाढवण्याचा कारणांपैकी एक आहे. त्या आयोजनांमध्ये नियमांचे पालन करण्यात आले नाही. WHOने हेदेखील म्हटले की, संक्रमण वाढण्यामागे या आयोजनांची किती टक्के भूमिका आहे, हे अद्याप सांगू शकत नाही. पण, या कारणांना नाकारता येत नाही.

WHO चे म्हणणे आहे की, भारतात कोरोनाचा B.1.617 व्हेरिएंट पहिल्यांदा ऑक्टोबर 2020 मध्ये समोर आला होता. दरम्यान, भारतात पुन्हा वाढत असलेल्या कोरोना संसर्ग आणि मृत्यूमागे कोरोनाचे B.1.617 आणि B.1.1.7 सारखे नवे व्हेरिएंट असण्याची शक्यता आहे.

जागतिक आरोग्य संगटनेच्या वीकली अपडेटमध्ये म्हटले आहे की, कोरोना व्हेरिएंटची माहिती जाणून घेण्यासाठी भारतातील कोरोना पॉझिटिव्ह सँपलपैकी 0.1% सँपलला ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑन शेअरिंग ऑल इन्फ्लूएन्जा डेटा (GISAID) वर सीक्वेंस केले होते. यात समजले की, B.1.1.7 आणि B.1.612 सारख्या व्हेरिएंटमुळे कोरोना पसरला.

कोरोनाच्या B.1.617 व्हेरिएंटचा वेग जास्त

WHO ने सांगितल्यानुसार, एप्रिलच्या अखेरपर्यंत भारतात कोरोनाच्या 21% रुग्णांमध्ये B.1.617.1 आणि 7% रुग्णांमध्ये B.1.617.2 व्हेरिएंट आढळला. इतर व्हेरिएंटच्या तुलनेत या दोन व्हेरिएंटचा संसर्ग जास्त आहे. WHO ने सांगितल्यानुसार, भारतानंतर B.1.617 चे सर्वाधिक प्रकरण ब्रिटनमध्ये आढळले.

बातम्या आणखी आहेत...