आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Whole Week Of Parliament Was Spent In Chaos; Opposition Groups Called For A Boycott

नवी दिल्ली:संसदेचा संपूर्ण आठवडा गोंधळातच उलटून गेला; सरकार म्हणाले, हेरगिरी कांडावर विरोधक स्पष्टीकरण मागू शकतात

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संसदेत शुक्रवारीही पेगासस हेरगिरी मुद्द्यावरून गोंधळ सुरूच होता. सरकारने विरोधकांशी समेटाचे संकेत शुक्रवारी दिले आहेत. लोकसभा स्थगित झाल्यानंतर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘विरोधकांकडे अजूनही पर्याय आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याप्रकरणी दिलेल्या वक्तव्यावर विरोधक स्पष्टीकरण मागू शकतात.पण मंत्री राज्यसभेत निवेदन करत असताना त्यांच्या हातातील कागद ओढून फाडले गेले.’

दरम्यान, राज्यसभेतही शुक्रवारी हेरगिरी कांडासह कृषी कायदा आणि महागाईवरून विरोधकांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातला. दुपारनंतर कृषिमंत्र्यांनी एक विधेयक सादर केले. ते गोंधळातच आवाजी मतदानाने पारित करण्यात आले. त्यानंतर राज्यसभा सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आली.

सरकारविरोधात हक्क भंगाची नोटीस : ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे देशात कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झाला नाही, या सरकारच्या उत्तरावर हक्कभंगाची नोटीस देण्यात आली आहे. राज्यसभेत काँग्रेसचे खासदार के.सी. वेणुगोपाल यांनी ही नोटीस दिली.

लोकसभेतही झाले नाही कामकाज
लोकसभेत हेरगिरी कांडावरून प्रश्नोत्तराच्या तासात विरोधी सदस्य घोषणाबाजी करत हाती फलक घेऊन उभे राहिले. यावर संसदीय कामकाज मंत्री जोशी म्हणाले की, हा काही मुद्दाच नाही. सरकार जनतेशी निगडित मुद्द्यांवर चर्चेस तयार आहे. आम्ही विनाचर्चा विधेयक मंजूर करू इच्छित नाही. विरोधकांचे वागणे दुर्दैवी आहे.

बातम्या आणखी आहेत...