आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरधाव वेगातील BMWचा कहर:भरधाव कारने दुभाजक ओलांडून स्कूटी चालवणाऱ्या महिलेले उडवले, संपूर्ण घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकच्या मंगळुर येथे शनिवारी एका भरधाव वेगातील बीएमडब्ल्यू कारने डिव्हायडर अर्थात दुभाजक ओलांडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजुने स्कूटीवर जाणाऱ्या एका महिलेले उडवले. या कारचा वेग एवढा होता की स्कूटीला टक्कर दिल्यानंतर ती अन्य एका कारला धडकली. त्यात स्कूटीवरील महिला दोन्ही कारच्या मधोमध अडकली.

ही घटना मंगळुरच्या वल्लभगढ जंक्शनवर घडली. तथापि, स्कूटीच्या पाठीमागून येणाऱ्या कार चालकाने वेळीच ब्रेक लावल्यामुळे स्कूटीचालक महिलेचे प्राण बालंबाल बचावले. सध्या जखमी महिलेला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सीसीटीव्हीत कैद झाली घटना

या अपघाताचा संपूर्ण थरार CCTV कॅमेऱ्यांत कैद झाला आहे. सोशल मीडियावरही हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या अपघातात स्कूटीच्या पाठीमागून येणारा कारचालकही जखमी झाला आहे. त्यावरुन बीएमडब्ल्यूच्या वेगचा अंदाज बांधता येतो. दुभाजकावर अन्य एक महिलाही उभी होती. ती ही या अपघातात जखमी झाली आहे.

आरोपी ड्रायव्हर अटकेत

एका वृत्तानुसार, घटनेनंतर तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी कसेतरी जखमी महिलेला दोन्ही कारच्या मधून बाहेर काढले. त्या महिलेला साधे उभेही राहता येत नव्हते. तिला तत्काळ रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यानंतर जमावाने बीएमडब्ल्यूच्या चालकाला बेदम मारहाण केली. नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. शहर वाहतूक पोलिस या घटनेची चौकशी करत आहेत. आरोपी चालक अपघातावेळी मद्यधूंद असल्याचे दिसून आले.