आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The Woman Who Was Pierced Will Have To Go Home And Tie Rakhi; The Condition Laid Down By The Court While Granting Bail

जामीनाची अट:ज्या महिलेची छेड काढली तिच्या घरी जात राखी बांधावी लागेल; जामीनासाठी न्यायालयाने ठेवली अट

इंदूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठाने एका व्यक्तीला जामीन देत अट ठेवली की, ज्या महिलेची त्याने छेड काढली होती तिच्या घरी जात राखी बांधावी लागेल. मुलांना पैसेही द्यावे लागतील.

एप्रिलमध्ये विक्रम बागरी नावाच्या व्यक्तीने एका महिलेच्या घरात घुसून तिची छेड काढली होती. पीडित महिलेच्या नातेवाइकांनी विक्रमविरोधात गुन्हा दाखल केला होता. विक्रम बागरी याने उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. उच्च न्यायालयाने जामिनाच्या आदेशात म्हटले की, त्याने त्याच्या पत्नीसोबत महिलेच्या घरी जावे. महिलेला त्याने सांगावे की, भाऊ म्हणून स्वीकार कर. त्याने तिचे आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन द्यावे. राखी बांधल्यानंतर ११००० रुपयेही द्यावेत. ३ ऑगस्टला विक्रम बागरी याला न्यायालयाने घालून दिलेल्या या अटीचे पालन करावे लागणार आहे.