• Home
  • National
  • The woman, who was sitting in the wrong train, went to Jaipur, relatives avoided, train did help

मुलाबराेबर चुकीच्या गाडीत बसलेली महिला जयपूरला गेली, नातेवाइकांची टाळाटाळ, रेल्वेने केली व्यवस्था

  • दिव्य मराठी विशेष : पाटण्याची महिला, माहेर असलेल्या नागपूरहून येत होती परत

दिव्य मराठी

Mar 26,2020 11:26:00 AM IST

शिवांग चतुर्वेदी


जयपुर : कोरोनावायरसने प्रत्येकाच्या मनात भितीचे घर केले अाहे. त्यामुळेच अाता अापल्या रक्ताचे नातेवाईकही ताेंड फिरवू लागले अाहे. परंतु अज्ञात लोक देव बनून समाेर अाले अाणि त्यांनी मदत केली. असा प्रसंग साेमवारी जयपूर रेल्वे स्थानकावर बघायला मिळाला. वास्तविक पाटण्याला राहणारी अस्मिता अापल्या चार वर्षाच्या मुलीसह महाराष्ट्रातील नागपूर येथे तिच्या माहेरी हाेती. रविवारी परत येताना ती चुकीच्या गाडीत बसल्याने जयपूरला पाेहचली. येथे तिने अापल्या जयपूर व काेटा येथील नातेवाईकांना फाेन केला परंतु त्यांनी घरात मुले असल्याचे कारण सांगत घरी येण्यास मनाई केली. यावर रेल्वेने त्याला आश्रय दिला. अस्मिता म्हणाली, एप्रिलच्या सुरुवातीला मुलाखत आहे, घरी ये असा शनिवारी पती उमेश याचा फाेन अाला . बागमती एक्स्प्रेसचे स्लीपर क्लासमध्ये नागपूर ते पाटणा असे तिकीट बुक केले. रविवारी संध्याकाळी नागपूर स्टेशनला अाल्यावर चुकीने म्हैसूर-जयपूर एक्सप्रेसमध्ये चढली. डब्यात जास्त प्रवासी नव्हते. त्यामुळे तिकीटात दिलेल्या बर्थवर जाऊन झाेपली. काेणताही तिकीट तपासनिस तिकीट तपासण्यासाठी अाला नाही. सकाळी डाेळे उघडून बघते तर गाडी जयपूर स्थानकावर हाेती. मुलीला घेऊन उतरली. नंतर तिने स्थानकावरील अारपीएफचे मुख्य काॅन्स्टेबल ममता अाणि अशाेक कुमार यांच्याकडे चाैकशी केल्यावर चुकीच्या गाडीचे कळले. नंतर स्टेशन सुप्रिटेंडंट डी.एल तनेजा, आरपीएफ निरिक्षक राजकुमार यांनी तिला अाश्रय दिला.


१,००० किमी दूर नागपूरवरून माेटारसायकलने घ्यायला येताेय भाऊ


अस्मिताला स्टेशनवरच्या रेस्ट रुममध्ये अाश्रय देऊन तिला जेवायला दिले. घरुन मुलीसाठी दूध मागवून मुलीची व्यवस्था केली. नंतर अस्मिताने नागपूरमधील अापला भाऊ रितेशला फाेन करून ही माहिती दिली अाणि रडायला लागली. नंतर स्टेशन अधीक्षक डी.एल तनेजा यांनी रितेशशी बाेलून त्याला घडलेला प्रकार सांगितला. अाता रितेश सकाळी दहा वाजता नागपूरहून जयपूरला येण्यासाठी रवाना झाला अाहे. जयपूरपासून नागपूर ९८० किलाेमीटर दूर अाहे. येथे येण्यास त्याला २८ ते ३० तास लागतात. मध्ये महाराष्ट्र, मध्यप्रदेश व राजस्थानची सीमा लागते.


X