आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हाथरसमध्ये तरुणीवर झालेल्या अत्याचारामुळे संपूर्ण देश संतप्त आहे. तरुणीवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी देण्याची मागणी होत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर हाथरसच्या बलात्कार पीडितेचा एक फोटो व्हायरल होत आहे. पण, हा फोटो हाथरस बलात्कार पीडितेचा नसून, चंदिगड मधल्या भलत्याच मनीषाचा असल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोमधील तरुणीचे नाव मनीषा यादव आहे, जिचा दोन वर्षांपूर्वी एका आजारात मृत्यू झाला आहे. कळत-नकळत चंदिगडच्या तरुणीचा फोटो हाथरस बलात्कार पीडित म्हणून व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, सामान्य नागरीकच नाही, तर मोठं-मोठे सेलिब्रीटीही चंडीगडच्या मनीषाचा फोटो हाथरस पीडित म्हणून व्हायरल होत आहे. या सर्वातून चंदिगड मधल्या मनीषाच्या कुटुंबियांना मानसिक त्रासातून जावे लागत आहे.
चंदिगडमधील मनीषाचे वडील मोहन लाल यादव म्हणाले की, त्यांना खूप दुःख होत आहे. मृत्यूनंतरही त्यांच्या मुलीची देशभरात बदनामी होत आहे. मोहन लाल यांनी बुधवारी चंदिगडच्या एसएसपीला याबाबत तक्रार केली आहे आणि सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोला थांबवण्याची मागणी केली आहे. चंदिगड पोलिसांनी याप्रकरणी कारवाई केली जाईल, असे सांगितले आहे.
मुतखड्याच्या आजाराने मनीषाचा मृत्यू
मनीषा यादवचे कुटुंब रामदरबार कॉलनीमध्ये राहते. मनीषाचे 21 जून 2018 ला लग्न झाले होते. मनीषाला मुतखड्याचा त्रास होता आणि हा त्रास वाढल्याने 22 जुलै 2018 ला मनीषाचा मृत्यू झाला.
दरम्यान, एडवोकेट अनिल गोगना यांनी सांगितले की, अशाप्रकारे बलात्कार पीडितेचा किंवा कोणत्याही प्रकारची खासगी माहिती सार्वजनिक करणे गुन्हा आहे. असे करणाऱ्यावर आयपीसी कलम 228(ए) अंतर्गत कारवाई होऊ शकते. या अंतर्गत दोषीला दोन वर्षांची शिक्षा आणि दंड लागू शकतो.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.