आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लसीवरून वाद:रशियाच्या काेराेना लसीच्या दाव्यावर जगाला संशय; पारदर्शी डेटाची मागणी

नवी दिल्ली/हैदराबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिका, जर्मनी, डब्ल्यूएचओ, भारताच्या तज्ञांनी उपस्थित केले प्रश्न
  • तज्ञांनी सांगितले- केवळ लस बनवणे पुरेसे नाही, ती सुरक्षितही असायला हवी
  • वृत्तांमध्ये दावा-रशियाने फक्त 38 जणांवर केली लसीची चाचणी

रशियाने कोरोना लस बनवण्याचा दावा केला असला तरी जग त्यावर अद्याप विश्वास ठेवायला तयार दिसत नाही. अमेरिका, जर्मनी, भारत आणि डब्ल्यूएचओच्या तज्ञांनी या लसीच्या सुरक्षेवर सवाल केले आहेत. अमेरिकेचे आरोग्य व मानव सेवा सचिव अॅलेक्स अजार यांनी सांगितले की, केवळ लस बनवणे पुरेसे नाही. लस अशी असावी जी जगभरातील लोकांसाठी सुरक्षित व प्रभावी हवी. लसीची सुरक्षा व प्रभाव सिद्ध करण्यासाठी पारदर्शी डेटा महत्त्वाचा आहे. अमेरिकेचे वरिष्ठ संसर्गजन्य रोगतज्ञ अँथनी फॉसी यांनी सांगितले की, रशियाची लस उपयोगी असल्याचे म्हणणे घाईचे होईल. तर जर्मनीच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, युरोपीय संघात वैद्यकीय चाचणीनंतरच औषधाला मंजुरी दिली जाते. आमच्याकडे रुग्णाचे संरक्षण महत्त्वाचे आहे. रशियाच्या लसीची गुणवत्ता, प्रभाव आणि सुरक्षेवर कोणतीही माहिती नाही.

वृत्तांमध्ये दावा-रशियाने फक्त ३८ जणांवर केली लसीची चाचणी

डब्ल्यूएचओ : संघटना म्हणाली - डेटाच्या आढाव्यानंतरच विश्वास ठेवणार

डब्ल्यूएचओचे प्रवक्ते तारिक जसारेविक यांनी सांगितले, आम्ही लसीवर रशियाच्या दाव्याबाबत आरोग्य अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत आहोत. कोणत्याही लसीचा प्रभाव जाणून घेण्यासाठी आवश्यक माहितीची कठोर समीक्षा व मूल्यांकन आवश्यक आहे. डब्ल्यूएचओचा हा नियम सर्वांसाठी समान आहे. सर्व देशांमध्ये नियामक संस्था लसीच्या वापराला मंजुरी देतात. उत्पादकांना डब्ल्यूएचओकडून प्री क्वालिफिकेशन प्रमाणपत्र घ्यावे लागते.

भारत : तज्ञ म्हणाले-तिसऱ्या टप्प्यात योग्य चाचणी घेतली नसावी, ती महत्त्वाची

दिल्ली एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी सांगितले, रशियाच्या लसीच्या साइड इफेक्टची तपासणी आवश्यक आहे. या लसीमुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते की नाही, हे बघावे लागेल. तर सीसीएमबीचे संचालक राकेश मिश्रा यांनी सांगितले, रशियाने तिसऱ्या टप्प्यातील चाचणी योग्य केली नाही. या टप्प्यात मोठ्या प्रमाणात लोकांना लस दिल्याने तिचा परिणाम दिसून येतो. रशियाने ही चाचणी घेतली आहे तर त्याचा डेटा जाहीर करायला हवा.

वृत्त : रशियाच्या लसीचे साइड इफेक्ट; वेदना, ताप, सूज आल्याचे दिसले

माध्यमातील वृत्तांत सांगितले आहे की, रशियाने ज्या लसीच्या यशाचा दावा केला आहे, तिची चाचणी केवळ ३८ जणांवर केली गेली आहे. लसीचे साइड इफेक्ट दिसले. चाचणीत वेदना, सूज, तीव्र ताप, अशक्तपणा, ऊर्जेची कमतरता, भूक न लागणे, डोकेदुखी, डायरिया, नाक बंद, गळा खराब, नाक वाहणे अशा तक्रारी आल्या. रशियन अधिकाऱ्यांनी फक्त ४२ दिवसांच्या संशोधनानंतर लसीला मंजुरी दिल्याचे समोर आले आहे.

प्रोग्रेस कार्ड : जगभरात १६५ देशांमध्ये सुरू आहे कोरोना लसीवर काम

जगभरातील १६५ देशांत संशाेधक कोरोना लसीवर काम करताहेत. एखादी लस तयार करण्यास अनेक वर्षे लागतात. मात्र बहुतांश देशांना वर्षभरात तयारी करायची आहे.

बातम्या आणखी आहेत...