आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The World Fears A Catastrophe If The Earth's Mercury Rises 2 Degrees, But It Has Happened; The Catastrophic Events Escalated, With India At The Center

एक्सक्लुझिव्ह:पृथ्वीचा पारा 2 अंश वाढल्यास प्रलय येण्याची जगाला वाटतेय भीती, पण ते घडले आहे; प्रलयंकारी घटना वाढल्या, भारत त्यांचा केंद्रबिंदू

औरंगाबाद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पृथ्वीचे तापमान १.५ ते २ अंश वाढले तर जगणे कठीण होईल, अशी भीती जगाला सतावत आहे. पण प्रत्यक्षात तापमान २ अंशांपेक्षा जास्त वाढले आहे. त्याचा पुरावा म्हणजे सूर्यातून प्रति चौरस मीटर २ वॅट ऊर्जेचा वर्षाव होत आहे. भारत वाढत्या तापमानाचा केंद्रबिंदू झाला आहे. ऑक्टोबर-२० मध्ये प्रकाशित ‘द इव्हेंट होरायझन’ या पुस्तकात प्रख्यात हवामानतज्ज्ञ अँडऱ्यू जॅक्सन यांनीही हेच म्हटले आहे.

भारताला धोका : देशात उष्णतेची लाट जेवढी तीव्र, तेवढी जगात कुठेच नाही
*१० वर्षांपूर्वी मार्च-एप्रिलमध्ये हिमालयात जेथे बर्फ असायचा तेथे आता मार्चमध्ये नाही. हिमालय
उत्तरेकडील थंड हवा भारताच्या सीमेत येण्यापासून रोखतो.
*आशियात ज्वालामुखीचे स्रोतही अनेक आहेत, टोंगासारख्याचा उद्रेक झाल्यास धोका वाढेल कारण भारत पृथ्वीच्या ट्रॉपिक्स भागात आहे आणि येथे ओझोनचा थर कमजोर आहे.
*भारतासारखी उष्णतेची लाट कुठेही दिसत नाही.

समस्या : १० हजार टन प्रति सेकंदाच्या गतीने आर्क्टिकमध्ये बर्फ वितळतोय
आर्क्टिक पांढऱ्या रंगाचा बर्फाळ समुद्र आहे. पांढरा रंग सूर्याची किरणे परावर्तित करतो आणि थंडपणा कायम ठेवतो. तेथे १० हजार टन/सेकंदाच्या गतीने बर्फ वितळत आहे. बहुधा याच दशकाअखेर तो निळा होईल. निळा समुद्र किरणे व त्याची उष्णता शोषेल. बर्फ वितळल्याने कोट्यवधी टन मिथेन वायुमंडळात मिसळेल. त्यामुळे ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जन अनेक पट वाढून प्रचंड उष्णता वाढू शकते.

उपाय : जमीन-पाणी स्रोतांना झाडांची सावली द्या, सोलार रिफ्लेक्टर लावा
पहिला उपाय असा की, जगातील सर्व लोकांनी शक्य असेल तिथे आपली जमीन आणि पाणी स्रोतांना सावली द्यावी, ती झाडांमुळेच शक्य आहे. दुसरा उपाय असा की, पहाड, छत आणि सर्वच उंच-सखल भागात सोलर रिफ्लेक्टर लावावेत, ते सूर्यप्रकाश जमिनीवर पडण्याआधीच आकाशाकडे वळवतील. काहीही न करता बसून राहिल्यास विनाशकारी परिणाम दिसणे निश्चित आहे.

ही चिंताही : आता औद्योगिक घडामोडी कमी केल्यानेही जागतिक हवामान वाढेल...
हे सर्वांनाच माहीत आहे की, औद्योगिकीकरणामुळे ग्रीनहाउस वायू उत्सर्जन वाढले आहे, ज्यामुळेे ग्लोबल वार्मिंग वाढत आहे. पण खूप कमी लोकांना हे माहीत आहे की, औद्योगिकीकरणामुळे पर्यावरणात एरोसोलही मिसळते, जे सूर्याची उष्णता पृथ्वीवर येणे रोखते. त्याला एरोसोल मास्किंग म्हणतात. म्हणजे अचानक औद्योगिकीकरण कमी केले तरी तापमान वाढेल कारण एरोसोलचे प्रमाण एकदम कमी होईल. ही एक प्रलयकारी घटना आहे.
शब्दांकन : रितेश शुक्ल

बातम्या आणखी आहेत...