आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरिद्वार:जगाला विकृतीकडून प्रकृतीकडे जावे लागेल, बाबा रामदेव यांचे प्रतिपादन

हरिद्वार16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पतंजली रिसर्च फाउंडेशन तथा पतंजली विद्यापीठ हरिद्वार तसेच सोसायटी फॉर कॉन्झर्वेशन अँड रिसोर्स डेव्हलपमेंट ऑफ मेडिसिनल प्लान्ट नवी दिल्ली, नाबार्ड (डेहराडून) यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय ‘पारंपरिक भारतीय चिकित्सेचे लोकआरोग्य व आैद्योगिक परिप्रेक्ष’ या विषयावर सोमवारी आंतरराष्ट्रीय संमेलनास सुरूवात झाली. संमेलनात नीति आयोगाचे सदस्य प्रो. रमेशचंद यांनी कृषी क्षेत्रातील सुधारणा व विकासासाठी नवीन तंत्रज्ञानावर चर्चा व पतंजलीच्या योगदानाचे कौतुक केले.

याप्रसंगी संमेलनाला मार्गदर्शन करताना बाबा रामदेव म्हणाले, वैभवशाली भारतासोबत आराेग्य, सुखी व समृद्ध विश्व घडवण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. आता जगाला विकृतीकडून प्रकृतीकडे वाटचाल करावी लागेल. उच्च तसेच वैज्ञानिक आधार असलेल्या संशोधन क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर पतंजली विशे‌ष काम करत आहे. आचार्य बालकृष्ण यांच्या मार्गदर्शनाखाली पाच लाखांहून जास्त श्लोकांची रचना तसेच एक लाखांहून जास्त पानांच्या ‘विश्व भेषज संहिता’ ची निर्मित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना पतंजलीद्वारे जैविक कृषी प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने भारत सरकार करत असलेल्या प्रयत्नांंबद्दल आचार्य बालाकृष्ण यांनी कौतुकोेद्गार काढले.

बातम्या आणखी आहेत...