आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The World Health Organization Excluded Covaxin From The Covax Program, Latest News And Update

कोव्हॅक्सिन 'कोव्हॅक्स' कार्यकमातून बाहेर:WHO ची कारवाई, भारत बायोटेकचे स्पष्टीकरण -आमची लस सुरक्षित व परिणामकारक; कोव्हॅक्सिन घेणाऱ्यांचे प्रमाणपत्र आजही वैध

हैदराबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्युएचओ) भारताच्या 'कोव्हॅक्सिन' या एकमेव स्वदेशी कोरोना प्रतिबंधक लसीला आपल्या 'कोव्हॅक्स' कार्यक्रमातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. या महत्वकांक्षी कार्यक्रमांतर्गत जगभरातील गरीब देशांना कोरोना लसींचा पुरवठा केला जातो. 'डब्ल्युएचओ'ने शनिवारी ही कारवाई केल्यानंतर हैदराबाद स्थित भारत बायोटकेने आपली लस सुरक्षित व परिणामकारक असल्याचा पुनरुच्चार केला आहे. तसेच ही लस घेतल्याचे प्रमाणत्रही वैध असल्याचे स्पष्ट केले आहे.

'कंपनीने कोव्हॅक्सिनच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड केली नाही. कोव्हॅक्सिन कोरोनापासून बचाव करण्यासाठी एक महत्वपूर्ण लस आहे. ही लस तयार करण्यासाठी कठोर मापदंड स्विकारले होते. यापुढे जागतिक मागणीनुसार सुधारणा व विकासाची प्रक्रिया राबवण्यात येईल', असे कंपनीने या प्रकरणी म्हटले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे भारत बायोटकेने गत काही दिवसांपासून कोव्हॅक्सिनच्या उत्पादनात काहीशी कपात केली आहे. यासाठी कंपनीने सरकारकडून मागणी कमी झाल्याचे कारण दिले आहे.

फॅसिलिटी व ऑप्टिमायझेशनसाठी उत्पादनात घट

दुसरीकडे, भारत बायोटेकच्या प्रवक्त्याने फॅसिलिटी व ऑप्टिमायझेशनसाठी कोव्हॅक्सिनच्या उत्पादनात घट केल्याचा दावा केला आहे. कंपनीने फॅसिलिटी ऑप्टिमायझेशनसाठी कोव्हॅक्सिनच्या उत्पादनात कपात केली आहे. कंपनी आता देखभाल, उत्पादन प्रक्रिया व साठवणूक सुविधा वाढवण्यावर लक्ष्य केंद्रीत करेल. गतवर्षी कंपनीच्या सर्वच सुविधांना कोव्हॅक्सिनच्या उत्पादनासाठी अपडेट करण्यात आले होते, असे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...