आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The World's First Vaccine For Children Over 12 Years Of Age Has Finally Opened Up

मुलांना लस:बारा वर्षांवरील मुलांच्या लसीचा मार्ग अखेर मोकळा, डीएनए तंत्रज्ञानाने तयार जगातील पहिली लस

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना विषाणूपासून बचावासाठी १२ वर्षांवरील वयाच्या मुलांना लस देण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. केंद्रीय औषधी मानक नियंत्रण संघटनेच्या (सीडीएससीओ) विषय तज्ज्ञ समितीने (एसईसी) तशी शिफारस केली आहे. त्यानंतर आता झायडस कॅडिलाच्या डीएनए तंत्रज्ञानाने तयार केलेल्या लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी देण्याची तयारी केली जात आहे. भारताच्या औषधी महानियंत्रकांच्या (डीसीजीआय) मंजुरीनंतर तिचा वापर करता येईल.

भारतीय नियामकांनी देशात आपत्कालीन वापराची मंजुरी दिलेली ही सहावी लस आहे. देशात तयार झालेली ही दुसरी आणि डीएनए तंत्रज्ञानाने तयार जगातील ही पहिली लस आहे. गुरुवारी सीडीएससीओच्या तज्ज्ञ समितीच्या बैठकीत तिच्या वापराची शिफारस करण्यात आली. सध्या तीन डोसच्या झायकोव्ह-डीला परवानगी आहे. पहिल्या डोसच्या २८ दिवसांनी दुसरा आणि ५६ व्या दिवशी तिसरा डोस दिला जाईल.

जाॅन्सन अँड जाॅन्सनने भारतात चाचणीची परवानगी मागितली
नवी दिल्ली | जाॅन्सन अँड जाॅन्सनने १२ ते १७ वर्षांच्या किशोरवयीन मुलांवर भारतात लसीचा अभ्यास करण्यासाठी परवानगी मागितली आहे. केंद्रीय औषधी मानक नियंत्रण संघटनेकडे (सीडीएससीओ) १७ आॅगस्टला अर्ज केल्याचे कंपनीने म्हटले आहे.
१२ ते १८ वर्षांची देशात सुमारे २६ कोटी मुले

झायकोव्ह-डी लस दोन ते ८ अंश सेल्सियस तापमानात सुरक्षित ठेवली जाऊ शकते. तथापि, कंपनीनुसार, २५ अंश तापमानातही ती खराब होण्याची शक्यता नाही. कंपनी दरवर्षी १० ते १२ कोटी डोस बनवू शकते. तिची किंमत अद्याप निश्चित नाही. तथापि, नॅशनल एक्स्पर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सिन अॅडमिनिस्ट्रेशन फॉर कोविड-१९ च्या (नॅगवॅक) एका सदस्याने ती किफायतशीर असेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. देशात १२ ते १८ वर्षे यादरम्यान असलेल्या मुलांची संख्या २५ ते २६ कोटी आहे.

बातम्या आणखी आहेत...