आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The World's Largest Toy Museum With 11 Lakh Toys Will Be Set Up In Gujarat At A Cost Of Rs 1,500 Crore

रंजक:1500 कोटी खर्चून गुजरातमध्ये उभारणार तब्बल 11 लाख खेळणी असलेले जगातील सर्वात मोठे टॉय संग्रहालय

शायर रावल | अहमदाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या सर्वात मोठे टॉय संग्रहालय अमेरिकेतील मिसौरी राज्यात आहे. येथे प्राचीनपासून आधुनिक काळातील १० लाखांपेक्षा जास्त खेळणी आहेत.
  • ‘बाल भवन’साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: करताहेत मार्गदर्शन, पायाभरणीही तेच करतील

गुजरातमध्ये जगातील सर्वात मोठे टॉय संग्रहालय होणार आहे. यासाठी ३० एकर जागा देण्यात आली आहे. ते गुजरातच्या बाल विद्यापीठाच्या बाल भवन प्रकल्पांतर्गत केले जात आहे. येथे प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंतची ११ लाखांपेक्षा जास्त खेळणी ठेवली जातील. खेळण्यांद्वारे शास्त्रज्ञ, कलावंत, महापुरुषांची ओळख करणे आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवून आणण्याचा यामागील हेतू आहे. राज्याची राजधानी गांधीनगर येथील गिफ्ट सिटीजवळ शाहपूर आणि रतनपूर गावांच्या दरम्यान तो करण्याची तयारी आहे. या बालभवनावर सुमारे १५०० कोटी रुपये खर्च होतील. ताे तयार करण्यात पाच वर्षांचा कालावधी जाईल.

बाल विद्यापीठाचे कुलगुरू हर्षद शहा यांनी भास्करला सांगितले की, येत्या दोन-तीन महिन्यांत बांधकामास प्रारंभ होईल. पंतप्रधान मोदींना भूमिपूजनासाठी निमंत्रित केले जाईल. पंतप्रधान स्वत: सक्रिय मार्गदर्शन करत आहेत. पंतप्रधानांनी २२ ऑगस्टला यासाठी ऑनलाइन संवादही साधला. त्यांनी बाल विद्यापीठाला टॉय संग्रहालयाच्या प्रकल्पाशी संबंधित प्रेझेंटेशन सादर करायला सांगितले. माेदींनी सांगितले की, बाल विद्यापीठाच्या या योजनेत पूर्ण ताकदीने काम करा.

विद्यापीठ खेळणीशास्त्र विकसित करेल, डीआरडीओ-इस्रो बनवेल खेळण्यांच्या प्रतिकृती

> मुलांना शास्त्रज्ञ, कलाकार, महापुरुषांची ओळख आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले जाईल. {गगनयान, क्षेपणास्त्रे, ईव्हीएम यंत्र, १८५७ ची क्रांती इत्यादींची माहिती खेळण्यांच्या माध्यमातून सांगितली जाईल.

> गुजराती, हिंदी, इंग्रजीसह अनेक भारतीय भाषा शिकण्यासाठी बाल विद्यापीठाचा अभ्यासक्रम असेल.

> डीआरडीओ, इस्रोच्या मदतीने इलेक्ट्रॉनिक, बॅटरी, सोलारआधारित लहान यान, पृथ्वी-अग्नी क्षेपणास्त्र, उपग्रह आदींच्या प्रतिकृतीत खेळणी तयार केली जातील.

> खेळण्यांद्वारे बालमनाला शिक्षण संस्कार देण्याचे विचार लक्षात घेऊन बाल विद्यापीठ खेळणीशास्त्र विकसित करेल.