आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The World's Longest Atal Tunnel At 10,000 Feet Is Ready, Inaugurated On October 3

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अटल सुरुंग:10 हजार फूट उंचीवरील जगातील सर्वात जास्त लांबीचा बोगदा सज्ज, उद्घाटन ३ ऑक्टोबरला

मनाली8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 9.2 किमी लांबीचा बोगदा, 46 किमी अंतर कमी होणार

हिमाचल प्रदेशातील मनाली आणि लडाखच्या लेहला जोडणारा अटल बाेगदा तयार झाला आहे. सुमारे १० हजार फूट उंचीवर तयार करण्यात आलेला हा सर्वात लांब बोगदा आहे. त्याची लांबी ९.२ किमी आहे. १० वर्षांत तो बांधून पूर्ण झाला. आता मनाली व लेह यांच्यातील अंतर ४६ मिनिटांनी कमी होईल. चार तासांच्या वेळेचीही बचत होणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ३ ऑक्टोबरला उद्घाटन होण्याची शक्यता आहे. उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमात कंगना रनौतदेखील सहभागी होऊ शकते. या प्रकल्पाला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी असे नाव देण्यात आले आहे. प्रकल्प संचालक कर्नल परीक्षित मेहरा म्हणाले, बांधकाम पूर्ण होण्यासाठी ६ वर्षे अपेक्षित होती, परंतु हवामानातील बदलामुळे निर्माण कार्यात विलंब झाला. लेहचा संपर्क हे स्वप्न होते. ते प्रत्यक्षात उतरले आहे. ही अत्यंत आव्हानात्मक योजना होती. कारण आम्ही दोन टोकांवर काम करत होतो. एक वर्षात केवळ पाच महिनेच काम होत होते.

अटल बोगदा दृष्टिक्षेपात..
2958 कोटी रुपये खर्चातून बांधकाम
14508 मेट्रिक स्टीलचा वापर
2,37,596 मेट्रिक सिमेंटचा वापर
14 लाख घन मीटर शिखरांवर खोदकाम
500 मीटर अंतरावर इमर्जन्सी एक्झिट
150 मीटर अंतरावर ४-जीची सुविधाही
10.5 मीटर रुंद, १० मीटर उंच बोगदा
60 मीटरच्या अंतरावर सीसीटीव्ही

बातम्या आणखी आहेत...