आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Worry Of Transferring The Vehicle To Another State Is Now Gone; News And Live Updates

BH सिरीज लाँच:दुसऱ्या राज्यात गेल्यास वाहन ट्रान्सफर करण्याची चिंता आता मिटली

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आतापर्यंत : १२ महिन्यांनंतर नवी नोंदणी

एका राज्यातून दुसऱ्या राज्यात गेल्यास खासगी वाहनाची नवीन नोंदणी करावी लागणार नाही. केंद्र सरकारने भारत सिरीज (BH) नोंदणी सुविधा सुरू केली आहे. ज्यांची वारंवार बदली होते त्यांच्यासाठी ही सुविधा आहे. मोटार वाहन अधिनियम (२० वी दुरुस्ती)- २०२१ या वर्षी १५ सप्टेंबरपासून लागू होईल. ही सुविधा ऐच्छिक असून त्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही. या सिरीजमध्ये नोंदणी केल्यावर मोटार वाहन कर दोन वर्षे किंवा दोनच्या पटीत (४-६-८...) लागेल. १४ व्या वर्षाच्या अखेरीस कर वार्षिक भरावा लागेल. ही सुविधा सध्या फक्त खासगी वाहनांसाठीच आहे.

अशी असेल नंबर प्लेट
पांढऱ्या प्लेटवर काळ्या रंगात (YYBH----XX) लिहिलेले असेल. यात YY पहिल्या नोंदणीच्या वर्षाचे शेवटचे अंक असतील. BH भारत सिरीजचा कोड असेल. ----०००० ते ९९९९ पर्यंत क्रमांक आणि XX A ते Z पर्यंत सिरीजनुसार दोन शब्द असतील.

आतापर्यंत : १२ महिन्यांनंतर नवी नोंदणी
मोटार वाहन अधिनियम- १९८८ च्या अंतर्गत दुसऱ्या राज्यात नोंदणीशिवाय १२ महिनेच वाहन चालवता येते. आता पहिल्यांदा नोंदणीच्या वेळी १५ वर्षांचा रस्ता कर लागतो. नव्या नोंदणीसाठी आधीच्या राज्यातून ना हरकत प्रमाणपत्र आणावे लागते. राहिलेला काळ म्हणजे मूळ नोंदणीनंतर जेवढी वर्षे राहिली असतील, त्याचा रस्ता कर द्यावा लागतो. आधीच्या राज्याकडून शिल्लक कर घेता येतो, मात्र परतावा प्रक्रिया खूप जटिल आहे.

कुणाला मिळेल सुविधा
केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयानुसार ही सुविधा सैन्यातील कर्मचारी, केंद्र व राज्य सरकारचे कर्मचारी व सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मिळेल. खासगी क्षेत्रातील ज्या कंपनीची कार्यालये चार किंवा जास्त राज्यांत आहेत, तिच्या कर्मचाऱ्यांनाही याचा लाभ घेता येईल.

किती लागेल कर
यासाठी कोणताही अतिरिक्त भार नाही. म्हणजे १० लाख रुपयांपर्यंतच्या खासगी वाहनासाठी ८%, १०-२० लाखांच्या वाहनांसाठी १०% तर २० लाखांपेक्षा जास्तीच्या वाहनांसाठी १२% रस्ता कर लागेल. डिझेल वाहनांसाठी २% अतिरिक्त लागेल. ईव्हीसाठी २% ची सवलत असेल.

बातम्या आणखी आहेत...